Tata Curvv SUV Discount Offer : टाटा मोटर्स आपल्या दमदार आणि सुरक्षित गाड्यांसाठी ओळखली जाते. दरम्यान, जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण Tata Motors ने आपल्या नव्या Curvv SUV वर मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. या ऑफरचा लाभ ICE आणि EV दोन्ही मॉडेल्सवर मिळणार आहे.
Tata Curvv SUV वर खास ऑफर
दिल्लीतील स्थानिक डीलरशिपकडून मिळालेल्या माहितीनुसार, Tata Curvv SUV खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 50,000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. MY2025 मॉडेलवर 20,000 रुपयांची तर MY2024 मॉडेलवर जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंतची सवलत दिली जात आहे.
![Tata Curvv SUV Discount Offer](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Tata-Curvv-SUV-Discount-Offer.jpeg)
तसेच Tata Curvv EV खरेदी करणाऱ्यांसाठीही 20,000 रुपयांपर्यंतच्या सूटचा लाभ घेता येणार आहे. यात कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. ही ऑफर वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि डीलरशिपनुसार बदलू शकते. त्यामुळे अधिक माहितीसाठी जवळच्या टाटा शोरूममध्ये संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.
Tata Curvv SUV ची किंमत आणि इंजिन पर्याय
भारतीय बाजारात Tata Curvv च्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटची किंमत 9.99 लाख रुपयांपासून 17.69 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे. हे वाहन स्मार्ट, प्योर प्लस, क्रिएटिव, क्रिएटिव प्लस एस आणि अॅकम्प्लिश्ड एस अशा विविध व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
Curvv SUV मध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल, 1.2-लिटर GDI टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. व्हेरिएंटनुसार यात 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DCT (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) गिअरबॉक्सचे पर्याय दिले जातात.
SUV च्या सुरक्षा वैशिष्ट्यांवर एक नजर
Curvv SUV सुरक्षिततेच्या दृष्टीने खूपच उत्कृष्ट आहे. या SUV ला BNCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यामध्ये 6-एअरबॅग्स, लेव्हल-2 ADAS (अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम), ESC (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल), TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम), इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स देण्यात आली आहेत.
Tata Curvv EV ची किंमत आणि वैशिष्ट्ये
Tata Curvv EV ची किंमत 17.49 लाख रुपयांपासून 21.99 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे. या इलेक्ट्रिक SUV मध्ये 45 KWh आणि 55 KWh क्षमतेचे दोन बॅटरी पॅक मिळतात.
एका चार्जमध्ये ही SUV 500 किमीची रेंज देते. नक्कीच जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Tata Curvv वर दिल्या जाणाऱ्या या विशेष ऑफरचा लाभ घ्या अन तुमचे नवीन कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करा.