Tata Group Stock : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. मात्र या घसरणीच्या काळातही टाटा समूहाचा एक स्टॉक फोकस मध्ये आला असून याच्या किंमती आज वधारल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार टाटा समूहाची कंपनी टाटा पावर चे शेअर्स आज गुरुवारी अर्थातच 20 फेब्रुवारी 2025 रोजी फोकस मध्ये राहिल्यात आणि याच्या किमती आज 4 टक्क्यांनी वाढून 361 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचल्या आहेत. दरम्यान, आज आपण टाटा ग्रुपच्या या कंपनीच्या स्टॉकच्या वाढीमागे नेमकी काय कारणे आहेत ? याचा उहापोह करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

स्टॉकच्या किमती वाढण्याचे कारण !
खरं तर, Tata Power ने Amazon Web Services (AWS) सोबत एक करार केला आहे ज्यामुळे देशाच्या ग्रीन, स्मार्ट आणि अधिक ग्राहक-केंद्रित एनर्जी इकोसिस्टममध्ये गती मिळणार आहे.
दरम्यान, या डीलची माहिती समोर आल्यानंतर टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली आहे. यामुळे आज 20 फेब्रुवारीला हा स्टॉक कमालीचा फोकस मध्ये असून आता आपण या डीलची तपशीलवार माहिती पाहूयात.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा पॉवरने ॲमेझॉन वेब सर्व्हिसेससोबत त्यांच्या डिजिटल पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि बुद्धिमान ऊर्जा व्यवस्थापन चालविण्यासाठी धोरणात्मक सहकार्य केले आहे.
ऊर्जा प्रणालीच्या उत्क्रांतीमध्ये पुरवठा आणि मागणी अनुकूल करण्यासाठी रिअल-टाइम विश्लेषणे, ऑटोमेशन आणि विकेंद्रित वीज उत्पादनाची आवश्यकता आहे.
टाटा पॉवर क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि IoT वापरून या डिजिटल-फर्स्ट आउटलुकवर लक्ष केंद्रित करेल जेणेकरून AWS सह भागीदारीद्वारे एक स्मार्ट, अधिक कार्यक्षम पॉवर इकोसिस्टम तयार होईल.
दरम्यान टाटा पावर च्या शेअर्स बाबत आता टॉप ब्रोकरेज कडून सकारात्मक आउटलुक दर्शवले जात आहेत. आगामी काळात टाटा पावर चे स्टॉक आणखी वाढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या स्टॉक बाबत बोलायचं झालं तर याचा 52 आठवड्याचा उच्चांक 494.85 इतका आणि 52 आठवड्याचा निचाँक 326.25 इतका आहे. या कंपनीचे मार्केट कॅपिटल एक लाख 14 हजार 325 कोटी इतके आहे.