Tata Group Stock : भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले आहेत. शेअर बाजारातील या घसरणीचा फटका टाटा समूहाची कंपनी ट्रेंटला सुद्धा बसला आहे.
या कंपनीच्या स्टॉकमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. फक्त एका महिन्याच्या काळातच हा शेअर 19 टक्के हुन अधिक घसरला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हा शेअर काल, 17 फेब्रुवारी 2025 रोजी 5,000 रुपयांच्या खाली पोहोचला.

ट्रेंटचा शेअर सोमवारी बीएसईवर 4,999.55 रुपयांपर्यंत घसरला. या रिटेल कंपनीच्या शेअर्सवर काही काळ मोठा दबाव होता. ट्रेंटच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 19 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्याच वेळी, कंपनीचा स्टॉक यावर्षी आतापर्यंत 29 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
अनुभवी गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी यांची ट्रेंटमध्ये मोठी गुंतवणूक आहे. दमाणी यांच्या पोर्टफोलिओ मधला हा एक महत्त्वाचा स्टॉक आहे. पण आता या स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून याचा फटका दमाणी यांना देखील बसला आहे.
खरेतर, दमानी यांनी त्यांच्या गुंतवणूक फर्मच्या माध्यमातून ट्रेंटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत आज आपण ट्रेंटची गेल्या पाच वर्षांची कामगिरी कशी राहिली आहे ? याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, टाटा समूहाची कंपनी ट्रेंटचे शेअर्स गेल्या चार महिन्यांत मोठ्या प्रमाणात दबावात आहेत.
या कंपनीचे स्टॉक फक्त चार महिन्यात 35 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर 2024 रोजी ट्रेंटचे शेअर्स 7719.65 रुपयांवर होते. मात्र काल, 17 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीचे शेअर्स 4,999.55 रुपयांवर पोहोचलेत. गेल्या 6 महिन्याचा विचार केला असता या कंपनीच्या स्टॉक मध्ये 25 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्च पातळी 8345.85 रुपये अन याच्या 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 3752 रुपये इतकी राहिली आहे. दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांचा ट्रेंटवर मोठा विश्वास आहे अन त्यांनी यात मोठी गुंतवणूक सुद्धा केली आहे. दमानी यांच्याकडे ट्रेंटचे 4507507 शेअर्स आहेत.
दमानी यांनी त्यांच्या डेरिव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या गुंतवणूक फर्मच्या माध्यमातून ट्रेंटमध्ये गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे ट्रेंटमध्ये त्यांची एकूण हिस्सेदारी 1.27 टक्के आहे. टाटा समूहाच्या या कंपनीत म्युच्युअल फंडांचा जवळपास 11 टक्के हिस्सा आहे. सध्या टाटा समूहाच्या या कंपनीचे स्टॉक दिवसेंदिवस घसरत आहेत.
परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे ही देखील वास्तविकता नाकारून चालत नाही. याच्या शेअर्समध्ये गेल्या 5 वर्षांत 550 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 20 फेब्रुवारी 2020 रोजी ट्रेंटचे शेअर्स 774.35 रुपयांवर होते. 17 फेब्रुवारी 2025 रोजी रिटेल कंपनीचे शेअर्स 4,999.55 रुपयांवर पोहोचले आहेत.
गेल्या 3 वर्षांत ट्रेंटच्या शेअर्समध्ये सुमारे 385 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या दोन वर्षांत या स्टॉकने 270 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. एकंदरीत या कंपनीच्या स्टॉकची अलीकडील कामगिरी फारशी उत्साहवर्धक राहिलेली नाही मात्र गत पाच वर्षांच्या काळात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.