Tata समूहाच्या ‘या’ कंपनीचा स्टॉक एका दिवसात 970 रुपयांनी वधारला ! कंपनीचा प्रॉफिट 42 टक्क्यांनी वाढला, आता पुढे काय?

Tata समूहाची टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचा स्टॉक सध्या फोकस मध्ये आहे. या स्टॉक मध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत असून आज या स्टॉकच्या किमती तब्बल 17 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या स्टॉकच्या किमती एका दिवसातच 970 रुपयांनी वाढल्या असून सध्या हा स्टॉक 6207 रुपयांच्या दरम्यान ट्रेड करत आहे. खरे तर कंपनीने अलीकडेच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत अन कंपनीचे तिमाही निकाल फारच दमदार राहिले आहेत. म्हणूनच सध्या या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये असून आगामी काळात यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल असा विश्वास व्यक्त होतांना दिसत आहे.

Tejas B Shelar
Published:

Tata Group Stock : भारतीय शेअर बाजारात आज 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी थोडी रिकवरी पाहायला मिळाली होती. मार्केट ओपन झाले त्यावेळी शेअर बाजारात रिकव्हरी दिसली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये थोडीशी सुधारणा झाली आणि त्यानंतर गुंतवणूकदारांच्या आशा देखील पल्लवीत झाल्यात. मात्र नंतर बाजारात पुन्हा एकदा नरमाई दिसून आली.

अशातच, मात्र टाटा समूहाच्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनबाबत सकारात्मक आउटलूक समोर येत आहे. आज शेअर बाजारात चढ-उतार दिसला मात्र या कंपनीच्या स्टॉक मध्ये आज तब्बल 17 टक्क्यांची वाढ नमूद करण्यात आली आहे. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात उत्साही बनले आहेत.

आज 19 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचे स्टॉक 17 टक्क्यांनी वाढून 6207.20 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजे एकाच दिवसात या स्टॉकच्या किमती 970 रुपयांनी वाढल्या आहेत. या स्टॉकची प्रेविअस क्लोजिंग प्राईस म्हणजेच काल या कंपनीचा स्टॉक हा 5233.55 क्लोज झाला होता.

खरंतर या कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण गेल्या पाच वर्षांमध्ये या स्टॉकची शेअर बाजारातील कामगिरी कशी राहिली आहे आणि या कंपनीचे तिमाही निकाल कसे आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिलेत?

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचा नफा 42.57 टक्क्यांनी वाढलाय. कंपनीचा नफा हा 34.33 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीचा नफा फक्त 24.08 कोटी रुपये होता. ऑक्टोबर-डिसेंबर 2024 तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 43.67 कोटी रुपये होती.

कंपनीच्या निव्वळ विक्रीत मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 42.67 टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 30.61 कोटी रुपये होती. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीचा EBITDA 34.87 कोटी रुपये होता, जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत 25.64 कोटी रुपये होता.

म्हणजेच या कंपनीचे तिमाही निकाल फारच छान राहिले आहेत. हेच कारण आहे की सध्या या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले असून या कंपनीच्या स्टॉकच्या किमतीत सातत्याने वाढ सुद्धा होत आहे. आता आपण या स्टॉकची गेल्या पाच वर्षांमधील कामगिरी बाबतची माहिती पाहणार आहोत.

कशी राहिली 5 वर्षांची कामगिरी ?

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स गेल्या 5 वर्षांत 550 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. हे शेअर्स 20 फेब्रुवारी 2020 रोजी 922.65 रुपयांवर होते. आज 19 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीचे शेअर्स 6207.20 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या चार वर्षांत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 475 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

19 फेब्रुवारी 2021 रोजी कंपनीचे शेअर्स 1055.90 रुपयांवर होते. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स 19 फेब्रुवारी 2025 रोजी 6200 रुपयांच्या पुढे गेले आहेत. या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्च पातळी 9744.40 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 5147.15 रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe