Tata Group Stock To Buy : Tata समूहाच्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. खरंतर अलीकडे या स्टॉकच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झालीये. हा स्टॉक गेल्या एका वर्षात 27% हून अधिक घसरला आहे. यामुळे शेअर होल्डर्सचे मोठे नुकसान झाले आहे.
18 फेब्रुवारी 2025 रोजी हा स्टॉक 0.62 टक्क्यांनी घसरला. सध्या हा स्टॉक 682.40 रुपयांवर ट्रेड करतोय. मात्र पुढील काळात या स्टॉकच्या किमती 90% पर्यंत वाढू शकतात असा अंदाज आहे.

अशा परिस्थितीत आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती, गेल्या पाच वर्षांमध्ये शेअर बाजारातील कामगिरी आणि या स्टॉक साठी टॉप ब्रोकरेज कडून काय सल्ला देण्यात आला आहे याबाबतचा आढावा घेणार आहोत.
टाटा मोटर्सची गेल्या पाच वर्षांमधील कामगिरी
YTD आधारावर टाटा मोटर्स शेअर 7.75 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या एका वर्षात या कंपनीचे स्टॉक 27.03 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र गेल्या तीन वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 39.32% परतावा दिला आहे. तसेच केल्या पाच वर्षात या कंपनीचे स्टॉक 325.15 टक्क्यांनी वधारले आहेत.
टाटा मोटर्सची सध्याची स्थिती कशी आहे?
17 फेब्रुवारीला हा स्टॉक 686.60 रुपयांवर क्लोज झाला होता मात्र 18 फेब्रुवारीला या स्टॉकच्या किमती 682.40 रुपयांपर्यंत खाली आल्यात. या स्टॉकचा 52 आठवड्याचा उच्चांक 1179 रुपये आणि 52 आठवड्याचा निचांक 667.05 इतका आहे.
सध्या या कंपनीचे मार्केट कॅपिटल दोन लाख 51 हजार 683 कोटी इतके आहे. तसेच या कंपनीवर एक लाख सहा हजार 549 कोटी रुपये इतके कर्ज आहे. आता आपण या कंपनीसाठी टॉप ब्रोकरेज कडून काय सल्ला देण्यात आला आहे याबाबत माहिती पाहूयात.
ब्रोकरेजची टार्गेट प्राईस काय
स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून पुढील काळात हा स्टॉक चांगली कामगिरी करणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सध्या हा स्टॉक 682.40 वर ट्रेड करत आहे मात्र पुढील काळात या स्टॉकच्या किमती 90.85% पर्यंत वाढू शकतात असा अंदाज आहे.
या स्टॉक साठी स्टॉक मार्केटच्या टॉप ब्रोकरेज कडून बाय रेटिंग देण्यात आली आहे. तसेच यासाठी 1300 रुपयांचे टार्गेट प्राईस सुद्धा निश्चित करण्यात आले आहे.