Tata Group Stock To Buy : भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे. मात्र या घसरणीच्या काळातही काही कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत असून टॉप ब्रोकरेज कडून काही कंपन्या आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात असे म्हटले जात आहे.
अशा परिस्थितीत, जर तुम्हीही टाटा समूहाच्या एखाद्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे. कारण असे की आज आपण टाटा समूहाच्या अशा एका स्टॉकची माहिती जाणून घेणार आहोत जो की आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार आहे.

टाटा समूहाच्या या स्टॉकवर ब्रोकरेज बुलिश आहेत आणि हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज कडून दिला जातोय. आम्ही ज्या स्टॉक बाबत बोलत आहोत तो स्टॉक आहे टाटा पॉवरचा.
हा स्टॉक गेल्या शुक्रवारी म्हणजेच 21 फेब्रुवारी 2025 रोजी दोन टक्क्यांनी वाढला आणि या दिवशी हा स्टॉक 362.30 या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. मात्र, या उच्चांकावरून तो शुक्रवारी थोडासा घसरला आणि 357.40 रुपयांवर क्लोज झाला.
पण पुढील काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना छान रिटर्न देऊ शकतो असा अंदाज आहे. ब्रोकरेज या स्टॉकवर बुलिश आहेत. म्हणून आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती अन टॉप ब्रोकरेजने या स्टॉकसाठी काय टार्गेट प्राईस दिली आहे ? याबाबतचा आढावा घेणार आहोत.
शेअर बाजारातील सध्याची स्थिती
हा स्टॉक 21 फेब्रुवारी 2025 रोजी 357.40 रुपयांवर क्लोज झाला. या दिवशी या स्टॉकमध्ये दोन टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. परंतु गेल्या एका वर्षाची या स्टॉकची कामगिरी फारच निराशाजनक आहे. गेल्या बारा महिन्यांच्या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत.
गेल्या वर्षभरात हा स्टॉक 6 टक्क्यांनी घसरला आहे आणि 1 जानेवारी 2025 पासून ते आत्तापर्यंत या स्टॉकच्या किमती 10 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. या स्टॉकचा 52 आठवड्याचा उच्चांक 494.85 अन 52 आठवड्याचा नीच्चांक 326.25 रुपये इतका आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,14,201.44 कोटी रुपये इतके आहे.
टार्गेट प्राईस काय?
दरम्यान, टाटा पावरच्या स्टॉकसाठी टॉप ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल कडून सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. मोतीलाल ओसवालने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे म्हणजे हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या शेअरसाठी ब्रोकरेज कडून 490 यांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.
म्हणजेच सध्याच्या किमतीपेक्षा हा स्टॉक 37% अपसाईड ग्रो करणार असा अंदाज आहे. या स्टॉक मधून आगामी काळात गुंतवणूकदारांना 37% पर्यंतचे रिटर्न मिळणार असा अंदाज व्यक्त होत असल्याने हा स्टॉक फोकस मध्ये येण्याची शक्यता आहे.













