Tata ग्रुपचा ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल, 95% रिटर्न मिळणार

टाटा समूहाचे अनेक स्टॉक सध्या शेअर बाजारात संघर्ष करत आहेत. टाटा मोटर्स हा देखील समूहाचा एक महत्त्वाचा स्टॉक असून सध्या या कंपनीचे स्टॉक शेअर बाजारात संघर्ष करताना दिसत आहेत. मात्र आता या स्टॉकबाबत ब्रोकरेज कडून सकारात्मक आउटलूक समोर येत आहेत. टाटा मोटर्सचा स्टॉक आगामी काळात 95% पर्यंतचे रिटर्न देईल असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.

Published on -

Tata Group Stock To Buy : आज गेल्या अनेक दिवसानंतर भारतीय शेअर बाजारात सुधारणा दिसली. 25 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रेडिंग सुरु झाल्यापासून बीएसई अर्थातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स 275.74 अंकांनी वधारून 74730.15 वर पोहोचला, तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 47.85 अंकांनी वधारून 22601.20 वर पोहोचला आहे.

दरम्यान, जर तुम्हीही टाटा समूहाच्या एखाद्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरे तर टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या शेअर बाजारात संघर्षाचा काळ अनुभवत आहेत, पण टाटा तेथे नो घाटा असे म्हणतात.

अन याच प्रमाणे सध्या टाटा समूहाचा एक स्टॉक फोकस मध्ये आला आहे. टाटा मोटर्सच्या स्टॉकबाबत आता सकारात्मक संकेत समोर येत आहेत. हा स्टॉक अजूनही मार्केटमध्ये रेड झोनमध्ये आहे, मात्र लवकरच याच्या किमती वाढतील असे म्हटले जात आहे.

टॉप ब्रोकरेज कडून टाटा मोटर्ससाठी बाय रेटिंग देण्यात आली आहे अन लवकरच हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 90 ते 95% पर्यंतचे रिटर्न देणार असे म्हटले जात आहे.

दरम्यान आता आपण टाटा समूहाच्या टाटा मोटर्स या कंपनीच्या स्टॉकची सध्या शेअर बाजारातील स्थिती काय आहे? अन यासाठी ब्रोकरेज कडून काय टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे याबाबत माहिती पाहणार आहोत.

टाटा मोटर्सची सध्याची स्थिती कशी आहे?

आज 25 फेब्रुवारीला टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा स्टॉक -0.57 टक्क्यांनी घसरलाय, सध्या हा स्टॉक 664.45 रुपयांवर ट्रेड करत आहे. खरेतर आज शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु होताच टाटा मोटर्स लिमिटेड शेअर 667.75 रुपयांवर ओपन झाला होता.

मात्र नंतर यामध्ये घसरण झाली. या स्टॉकचा 52 आठवड्याचा उच्चांक हा 1179 रुपये अन 52 आठवड्याचा नीचांक 663 रुपये आहे. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,44,560 Cr. रुपये इतके असल्याचे सांगितले गेले आहे.

टार्गेट प्राईस काय आहे?

टॉप ब्रोकरेजने टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असे म्हटले आहे. सध्या हा स्टॉक 664 रुपयांच्या दरम्यान ट्रेड करत आहे मात्र भविष्यात याच्या किमती 90% हुन अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Yahoo Finance Analyst ने या स्टॉक साठी तब्बल 1300 रुपयांची टार्गेट प्राईस सेट केली आहे. ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार सध्याच्या किमतीपेक्षा हा स्टॉक 95 टक्के पेक्षा अधिक वाढणार आहे. यामुळे आगामी काळात या स्टॉकची स्थिती कशी राहते हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe