Tata Harrier EV Launch : टाटा मोटर्स ही देशातील एक दिग्गज ऑटो कंपनी म्हणून ओळखली जाते. भारतीय कार मार्केटमध्ये कंपनीने एक वेगळा ठसा उमटवला आहे. विशेषतः इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये कंपनीचा मोठा बोलबाला पाहायला मिळतोय. सध्या स्थितीला टाटा मोटर्स ही इलेक्ट्रिक सेगमेंट मधील सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आलेली आहे.
कारण की टाटा मोटर्सचा इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ हा इतर कंपन्यांच्या तुलनेत थोडासा स्ट्रॉंग दिसतो. अशातच आता टाटा ने आपल्या ग्राहकांना आणखी एक गुड न्यूज दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा कंपनीकडून अखेर कार टाटा हॅरियर ईव्ही लॉन्च करण्यात आली आहे.

या नव्या लॉन्चिंग मुळे कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ आणखी स्ट्रॉंग होणार आहे. दरम्यान आता आपण टाटा कंपनीच्या याच नव्या इलेक्ट्रिक एसयुव्हीच्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पहिल्यांदा ऑटो एक्सपो 2025 मध्ये सादर
टाटा मोटर्सचे हे मॉडेल पहिल्यांदाच ऑटो एक्स्पो 2025 मध्ये त्याच्या उत्पादन-तयार अवतारात प्रदर्शित करण्यात आले होते. तेव्हापासून या गाडीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती आणि लवकरच ही गाडी लॉन्च होणार अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या.
काही मीडिया रिपोर्ट मध्ये ही गाडी गेल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पण मे महिन्यात हे गाडी काय लॉन्च झाली नाही पण आता जून महिन्याच्या सुरुवातीलाच या गाडीची लौचिंग झाली आहव. दरम्यान या इलेक्ट्रिक एसयूव्हीची बुकिंग पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे, 2 जुलैपासून या गाडीची अधिकृत बुकिंग सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे.
एकदा चार्ज केल्यास 627 km पर्यंत चालणार
नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या टाटा हॅरियर ईव्हीमध्ये 75 kWh आणि 65 kWh असे दोन बॅटरी पॅक आहेत, जे की अनुक्रमे ड्युअल आणि सिंगल इलेक्ट्रिक मोटर्ससोबत येतील. या गाडीचे पॉवर फिगर 390 बीएचपी आणि 504 एनएम असे आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास 625 किलोमीटरपर्यंत धावू शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. ही गाडी अवघ्या 6.3 सेकंदात झिरो ते शंभर किलोमीटरचा वेग गाठण्यास सक्षम आहे.
लूक्स आणि फीचर्स कसे असणार?
या गाडीच्या डिझाइनच्या बाबत बोलायचं झालं तर या नव्या गाडीत नवीन फ्रंट आणि रियर बंपर, ब्लँक्ड-ऑफ ग्रिल आणि नवीन ड्युअल-टोन एरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जे की या गाडीच्या डिझेल व्हेरिएंट मध्ये आपल्याला दिसत नाहीत. ही गाडी एकूण चार कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होत आहे.
नैनिताल नॉक्टर्न, एम्पॉवर्ड ऑक्साइड, प्युअर ग्रे आणि प्रिस्टाइन व्हाइट अशा चार रंगांत ती गाडी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. एवढेच नाही तर कंपनीने या मॉडेलच्या स्टील्थ एडिशनची सुद्धा घोषणा केली आहे. आतापर्यंत कंपनीने कोणत्याच इलेक्ट्रिक SUV मध्ये हा एडिशन दिलेला नाही.
म्हणजे टाटा हॅरियर ईव्ही ही कंपनीची पहिली ईव्ही असेल जी की स्टील्थ एडिशन राहणार आहे. नवीन टाटा हॅरियर ईव्हीमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, फोर-स्पोक स्टीअरिंग व्हील, 14.5-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, पाच टेरेन मोड्स (सँड, रॉक-क्रॉल, मड रट्स, कस्टम आणि नॉर्मल),
व्हेंटिलेशन आणि मेमरी फंक्शन्ससह फ्रंट सीट्स, फ्रंट पॅसेंजर सीटसाठी बॉस मोड आणि दुसऱ्या रांगेसाठी कम्फर्ट हेडरेस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे ही गाडी ग्राहकांना आवडणार असा विश्वास कंपनीकडून व्यक्त केला जातोय. या गाडीला भारतीयांच्या माध्यमातून चांगली पसंती मिळण्याची शक्यता सुद्धा आहे.
किंमत किती आहे?
Tata हॅरियर ईव्हीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर टाटा कंपनीची ही भन्नाट कार 21.49 लाख रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही या गाडीची बेस मॉडेलची किंमत आहे आणि ही किंमत एक्स शोरूम आहे. या गाडीची ऑन रोड प्राईस ही यापेक्षा अधिक राहणार आहे. दरम्यान जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर पुढील महिन्यात यासाठीची बुकिंग सुरु होणार असून तुम्हाला लवकरात लवकर ही गाडी खरेदी करण्यासाठी बुकिंग करावे लागणार आहे.