Tata Harrier EV : तुम्हालाही येत्या काही दिवसांनी नवीन कार खरेदी करायची आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी विशेष खास ठरणार आहे. विशेषता ज्यांना टाटा कंपनीची नवीन SUV घ्यायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक महत्त्वाचे राहणार आहे कारण की टाटा कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की पुढील महिन्यात कंपनीकडून एक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाणार आहे.
ही नवीन इलेक्ट्रिक SUV 3 जून 2025 रोजी लाँच होईल. कंपनी हॅरियर ईव्ही पुढील महिन्याच्या तीन तारखेला लाँच करत आहे. खरंतर भारतीय कार मार्केटमधील इलेक्ट्रिक सेगमेंटचा विचार केला असता टाटा कंपनी सध्या बॉस आहे. कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ हा फारच स्ट्रॉंग आहे.

दरम्यान आता या सेगमेंटचा विस्तार करण्यासाठी कंपनीकडून ग्राहकांसाठी भारतातील पहिली डी एसयूव्ही सेगमेंट इलेक्ट्रिक SUV लाँच केली जात आहे. दरम्यान या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीबद्दल बरीच माहिती सुद्धा समोर आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण या अपकमिंग एसयुव्ही बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुढील महिन्यात लाँच होणार Tata Harrier EV
हॅरियर ईव्ही दिल्ली एनसीआर येथे झालेल्या 2025 च्या ऑटो एक्स्पोमध्ये दिसली होती. या गाडीच्या डिझाइनचा विचार केला तर, या गाडीच्या डिझाईन हे त्याच्या आयसीई मॉडेलसारखेच आहे. डिझाईन मध्ये कंपनीने फारसे बदल केलेले नाहीत.
या नव्या इलेक्ट्रिक कारमध्ये क्लोज ऑफ ग्रिलसह नवीन फॅसिया, नवीन बंपर आणि ईव्ही-स्पेसिफिक हायलाइट्स असतील जे की या आगामी एसयुव्हीला अधिक आकर्षक बनवतात. यात अलॉय व्हील डिझाइनचे नवीन संच आहेत जे त्याच्या आयसीई मॉडेलच्या समान 19 इंच आकाराचे असू शकतात अशी माहिती समोर आली आहे.
या गाडीवर ठिकठिकाणी EV बॅज देण्यात आले आहेत. लीक झालेल्या डिटेल नुसार, या गाडीच्या फ्रंट डोअरवर EV बॅज आणि टेलगेटवर हॅरियर EV बॅज पाहू शकतो. 2025 च्या ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित केलेल्या युनिटच्या साइड बॉडी क्लॅडिंगवर सिल्व्हर फिनिश होता जो व्हील आर्च आणि साइड डोअर मोल्डिंगवर दिसून आला होता.
पण जागतिक स्तरावर पदार्पणानंतर आणि पुणे प्लांटमध्ये प्रदर्शनादरम्यान पाहिल्या गेलेल्या टेस्ट म्यूलवर असे दिसून आले नाही. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या काही महिन्यांपूर्वी टाटा मोटर्सने आगामी हॅरियर ईव्हीच्या गाडीच्या इंटेरियर पार्टचा टीझर रिलीज केला होता.
यात असे दिसून आले की आयसीईमध्ये जसे इंटेरियर होते तसेच इंटरियर नव्या इलेक्ट्रिक SUV मध्ये सुद्धा आहेत. नव्या गाडीच्या इंटिरियर मध्ये सुद्धा फारसे बदल झालेले नाहीत. यामध्ये ड्युअल 12.3 इंच स्क्रीन, ड्युअल-झोन टच आणि टॉगल क्लायमेट कंट्रोल पॅनल, प्रकाशित लोगोसह स्टीअरिंग व्हील आणि इतर गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे.
गाडीचे फिचर्स आणि इंजिन कसे असणार ?
या SUV बाबत अधिक माहिती अशी की गाडीच्या सेंटर कन्सोलमध्ये, आपल्याला ड्राइव्ह मोड निवडीसाठी रोटरी डायल दिसणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकचे डिझाईन सुद्धा समान असू शकते.
हॅरियर ईव्हीमध्ये टाटा कंपनी नवीन टेरेन रिस्पॉन्स मोड ऑफर करण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. कारण आयसीई हॅरियरच्या तुलनेत त्यात ऑफ-रोड क्षमता खूप चांगल्या असतील आणि ग्राहकांना ही गोष्ट विशेष आकर्षित करू शकते.
हॅरियर ईव्हीबद्दल बोलायचे झाले तर, हॅरियर ईव्हीमध्ये ड्युअल मोटर पॉवरट्रेन (प्रत्येक एक्सलवर एक) राहणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे पॉवरट्रेन क्यूडब्ल्यूडी (एडब्ल्यूडी) क्षमतेला परमिशन देणार आहे.
या गाडीच्या ड्रायव्हिंग रेंज बाबत बोलायचं झालं तर एकदा ही गाडी फुल चार्ज केली की पाचशे किलोमीटर पर्यंत धावू शकते. म्हणजेच या गाडीची ड्रायव्हिंग रेंज ही इतर एसयुव्ही इलेक्ट्रिक व्हेईकलपेक्षा चांगली राहू शकते.