Tata Motor Upcoming Car : टाटा ही देशातील एक दिग्गज ऑटोमेकर कंपनी. ही कंपनी सातत्याने नवनवीन इन्वेंशन करत असते. Tata मोटर्सच्या वाहनांना ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो. दरम्यान जर तुम्हीही आगामी काळात टाटा मोटर्सची नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आगामी काही महिन्यात टाटा कंपनीकडून एक दोन नाही तर तब्बल सात नवीन गाड्या लॉन्च होणार आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा सुद्धा समावेश राहणार आहे. खरंतर इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये सध्या टाटा कंपनी टॉपला आहे.

महिंद्रा टाटा कंपनीला टप फाईट जरूर देत आहे मात्र अजूनही इलेक्ट्रिक सेगमेंटचा टाटा कंपनीचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग आहे. तसेच येत्या काही महिन्यांनी कंपनीकडून आणखी काही नव्या इलेक्ट्रिक कार्स लॉन्च होण्याची शक्यता असल्याने हा पोर्टफोलिओन की स्ट्रॉंग होणार आहे.
सध्या भारतात मारुती सुझुकी ही कंपनी सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते आणि यानंतर टाटा मोटर्सचा नंबर लागतो. दरम्यान, टाटा मोटर्सने देशातील दुसऱ्या क्रमांकाचा कार उत्पादक म्हणून आपले स्थान बळकट करण्यासाठी आता एक असा मास्टर प्लॅन रेडी केला ज्यामुळे ग्राहकांना आगामी काळात अनेक नवनवीन ऑप्शन्स उपलब्ध होणार आहेत.
कंपनी पुढील काही महिन्यांत सात नव्या गाड्या लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आता आपण कंपनी कोणत्या सात नव्या गाड्या बाजारात उतरवणार याबाबतचा आढावा घेणार आहोत.
Altroz Facelift : या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे अल्ट्रोज फेसलिफ्ट. Altroz ही टाटा मोटरची एक लोकप्रिय कार असून या गाडीची लोकप्रियता पाहता आता याचे फेसलिफ्ट वर्जन सुद्धा लाँच केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या नोव्हेंबरमध्ये ही गाडी मार्केट मध्ये येण्याची शक्यता आहे. या गाडीत नवीन LED हेडलाइट्स, अलॉय व्हील्स आणि स्टायलिश बंपर असेल जे की या गाडीला अधिक आकर्षक बनवणार आहे.
Harrier.ev : या यादीत दुसऱ्या स्थानी आहे Harrier.ev. ही कंपनीची या यादीतील सर्वात चर्चेत असणारी गाडी आहे. टाटा कंपनीची हॅरिअर एक लोकप्रिय गाडी असून याचेच इलेक्ट्रिक व्हर्जन कंपनी आता लवकरच मार्केटमध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, Harrier.ev 75–80 kWh बॅटरी पॅकसह सुमारे 500 किमीची रेंज देण्यास सक्षम राहणार आहे. या गाडीच्या लॉन्चिंग बाबत बोलायचं झालं तर कंपनीची ही इलेक्ट्रिक SUV जूनमध्ये भारतात लॉन्च केली जाऊ शकते. याची किंमत ही सुमारे 28–30 लाखांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Tata Sierra : जुलै महिन्यात टाटा कंपनी मोठा धमाका करणार आहे. या महिन्यात कंपनी एक नवीन कार आपल्या ग्राहकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. Tata Sierra जुलै महिन्यात लॉन्च होईल असे बोलले जात आहे. ICE Sierra मध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल व 2.0 लिटर डिझेल इंजिन राहणार असा एक अंदाज आहे.
Sierra.ev : Tata Sierra ICE सोबतच कंपनीकडून याची इलेक्ट्रिक आवृत्ती Sierra.ev सुद्धा लॉन्च केली जाणार आहे. ही गाडी सुद्धा जुलै महिन्यातच लॉन्च होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आधी इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च होणार की आयसीई हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दरम्यान, Sierra.ev एकदा चार्ज केल्यानंतर 500 km पर्यंतची रेंज देण्यास सक्षम असू शकते असे बोलले जात आहे.
Harrier Petrol : टाटा आपल्या ग्राहकांच्या प्रतिक्रियांना आणि अभिप्रायांना विशेष महत्त्व देते. ग्राहक खुश तो आपण खुश अशी टाटाची पॉलिसी. यामुळे टाटा हॅरिअर डिझेलच्या यशानंतर पेट्रोल हॅरिअर सुद्धा लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची बातमी हाती आली आहे. ही SUV गाडी जुलैमध्ये लॉन्च होऊ शकते असा अंदाज आहे. ही गाडी डिझेल वॅरीयंट सारखीच दिसणार आहे. 1.5 लिटर TGDi इंजिनसह ही गाडी बाजारात लॉन्च होईल.
Safari Petrol : टाटा कंपनी आपल्या एका लोकप्रिय कारचे पेट्रोल व्हेरिएंट बाजारात लॉन्च करणार आहे. Safari या लोकप्रिय कारचे पेट्रोल व्हेरिएंट टाटा कंपनीकडून येत्या काही महिन्यांनी बाजारात लॉन्च होणार असल्याची बातमी हाती आली आहे. ही SUV गाडी सुद्धा 1.5 लिटर TGDi इंजिनसह जुलै 2025 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
Safari.ev : टाटा कंपनीकडून फक्त पेट्रोल सफारीच नाही तर इलेक्ट्रिक सफारी सुद्धा लाँच करणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी ऑगस्ट 2025 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता असून याची किंमत ही जवळपास 26 ते 30 लाख रुपयांच्या आसपास असेल. मात्र ही गाडीची सुरुवातीची किंमत असेल टॉप मॉडेलची किंमत यापेक्षा अधिक असू शकते.