टाटा मोटर्स कंपनीचे शेअर गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरणार ! तज्ञांनी दिली बाय रेटिंग, शेअरच्या किमती इतक्या वाढणार

टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची सध्याची कामगिरी निराशाजनक आहे. काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आणि टाटा मोटर्सचे शेअर देखील काल घसरले. 24 जानेवारीला टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर 2.54 टक्क्यांनी घसरून 733.40 रुपयांवर पोहोचलेत.

Tata Motors Share Market

Tata Motors Share Market : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून शेअर बाजारात चढ उतार आहे. काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेंसेक्स मध्ये आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण नमूद करण्यात आली. साहजिकच यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

पण या चिंतेच्या वातावरणात गुंतवणूकदारांसाठी विशेषता टाटा मोटर्स कंपनीचे शेअर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आणि ज्यांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर नुकतेच खरेदी केले आहेत त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे टाटा मोटर्स कंपनीचे शेअर आगामी काळात रॉकेट तेजीत येण्याची शक्यता आहे. नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर विश्वास दाखवला आहे. या ब्रोकरेज फर्म ने टाटा मोटर्सच्या शेअरसाठी बाय रेटिंग दिलेली आहे अर्थातच हे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिलाय.

नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 990 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. म्हणजेच टाटा मोटर्स शेअर 990 रुपयांना टच करू शकतो असा दावा या ब्रोकरेज करणे केला आहे.

अर्थातच या ब्रोकरेज फर्मचा हा अंदाज खरा ठरला तर आगामी काळात गुंतवणूकदारांना या स्टॉक मधून चांगला परतावा मिळणार आहे. दरम्यान आज आपण टाटा मोटर्स शेअरची गेल्या काही वर्षांमधील कामगिरी, या शेअरची सध्याची शेअर बाजारातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

कशी आहे सध्याची कामगिरी?

टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची सध्याची कामगिरी निराशाजनक आहे. काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आणि टाटा मोटर्सचे शेअर देखील काल घसरले. 24 जानेवारीला टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर 2.54 टक्क्यांनी घसरून 733.40 रुपयांवर पोहोचलेत.

मागील ५ दिवसात कंपनीचे शेअर 4.72% घसरलेत. मागील एका महिन्यात हे शेअर 0.37% घसरलेत अन मागील ६ महिन्यात हा शेअर 28.64% घसरला आहे. मागील एका वर्षाचा विचार केला असता या कंपनीचे शेअर 9.56 टक्के घसरलेत.

मात्र गेल्या ५ वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या स्टॉकने गेल्या पाच वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 293.24 टक्के एवढा परतावा दिलाय. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 2,211.38 टक्के परतावा दिला आहे.

मात्र YTD आधारावर टाटा मोटर्स कंपनी शेअर 2.12% घसरला आहे. या कंपनीच्या मार्केट कॅप बाबत बोलायचं झालं तर सध्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,70,213 कोटी रुपये इतके आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,179 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 717.70 रुपये एवढा होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe