Tata Motors Share Price : भारतीय शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजाराच्या आठवड्याची सुरुवात फारशी उत्साही राहिली नसली तरी देखील आठवड्याचा शेवट गोड होताना दिसतोय. आज शुक्रवार, 31 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार तेजीसह खुला झाला. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स 244.32 अंकांनी वधारून 77004.13 वर अन नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी 91.80 अंकांनी वधारून 23341.30 वर खुला झाला.
दरम्यान शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी आली असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून गेल्या काही दिवसांपासून सतत ज्या स्टॉक मध्ये घसरगुंडी सुरू होती तो टाटा मोटरचा स्टॉक देखील आज फोकस मध्ये आलाय.
आज टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा शेअर 703.75 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच आज हा स्टॉक 0.98 टक्क्यांनी वाढलाय. या स्टॉकची प्रिव्हियस क्लोजिंग 696.85 एवढी नमूद करण्यात आली होती म्हणजेच हा स्टॉक काल 696.85 रुपयांवर क्लोज झाला होता.
मात्र आज यामध्ये वाढ नमूद करण्यात आली असून म्हणून हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला असून ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी नवीन टार्गेट प्राईज सुद्धा देण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती, या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे, या स्टॉकची नवीन टारगेट प्राईस? याबाबत माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टाटा मोटर्सची शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती
टाटा मोटरची प्रीवियस क्लोजिंग 696.85 रुपयांची होती. पण आज हा स्टॉक 0.98 टक्क्यांनी वधारून 703.75 रुपयांवर ट्रेड करतोय. याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,179.00 रुपये अन 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 683.20 रुपये इतका राहिलाय. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,59,151 Cr. रुपये इतके आहे अन या कंपनीवर 1,06,549 Cr. रुपये इतकं कर्ज आहे.
टाटा मोटर्स शेअरने किती परतावा दिला?
गेल्या 5 दिवसात हा शेअर -2.76 टक्क्यांनी, मागील 1 महिन्यात -4.92 टक्क्यांनी, मागील 6 महिन्यात -39.11 टक्क्यांनी, मागील 1 वर्षात – 20.35 टक्क्यांनी आणि YTD आधारावर -6.01 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र मागील 5 वर्षात टाटा मोटर्स लिमिटेड शेअर 327.34 टक्क्यांनी तसेच लॉन्ग टर्ममध्ये टाटा मोटर्स लिमिटेड शेअर 2119.51 टक्क्यांनी वाढला आहे.
नवीन टार्गेट प्राईस काय?
CLSA ब्रोकरेज ने टाटा मोटर्स साठी ओवरवेट रेटिंग दिली आहे. यासाठी ब्रोकरेज ने 930 रुपयांची टारगेट प्राईज देखील दिली आहे. म्हणजेच आगामी काळात हा स्टॉक चांगली कामगिरी करताना दिसू शकतो.
खरतर या स्टॉक मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती मात्र आता आगामी काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसेल असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.