Tata Motors Stock Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण सुरू आहे. आज सुद्धा बॉम्बे स्टॉकिंग एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण झाली. पण शेअर बाजारात सुरू असणाऱ्या या घसरणेमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, या घसरणीच्या काळातच टाटा समूहाच्या एका कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये आला आहे.
टाटा समूहाचा टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसेल असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी टाटा मोटर्सचे स्टॉक 0.39 टक्क्यांनी वाढलेत आणि सध्या हा स्टॉक 683.7 रुपयांवर ट्रेड करतोय.

दरम्यान आता आपण टाटा मोटर्स स्टॉकची सध्याची शेअर बाजारातील स्थिती आणि ब्रोकरेज फर्मकडून या स्टॉकसाठी काय टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे याबाबतची सविस्तर अपडेट पाहणार आहोत.
टाटा मोटर्सची सध्याची शेअर बाजारातील स्थिती
सध्या हा स्टॉक 683.7 रुपयांवर ट्रेड करतोय. या स्टॉकची 52 आठवड्याची उच्चांकी किंमत 1179 रुपये आणि 52 आठवड्याची निचांकी किंमत 667.05 इतकी आहे.
सध्या या कंपनीचे मार्केट कॅपिटल दोन लाख 51 हजार 223 कोटी रुपये इतके आहे. हा स्टॉक आज दिवसभर 675 ते 684.40 च्या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
टार्गेट प्राईस काय?
टाटा समूहाचा टाटा मोटर्स या स्टॉक साठी टॉप ब्रोकरेजकडून Hold रेटिंग देण्यात आली आहे. या स्टॉकच्या किमतीत आगामी काळात 90% हून अधिक वाढू शकतात असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.
Yahoo Finance Analyst ने या स्टॉक साठी होल्ड रेटिंग कायम ठेवली असून 1300 रुपयांचे टारगेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे. सध्या हा स्टॉक 683 च्या रेंजमध्ये ट्रेड करतोय आणि भविष्यात यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे.