Tata Punch : सध्या भारतात फेस्टिवल सिझन सुरू आहे. नुकताच गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व संपन्न झाला आहे. आता येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सव मग विजयादशमी अर्थातच दसरा आणि दिवाळी सारखें मोठं-मोठे सण येणार आहेत. दरम्यान याच सणासुदीच्या काळात अनेकांनी कार खरेदी करण्याचे स्वप्न उराशी बाळगल आहे. जर तुमचेही या सणासुदीच्या काळात नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.
खरेतर भारतीय कार मार्केटमध्ये बजेट फ्रेंडली कारची मोठी मागणी असते. खिशाला परवडणारी, जबरदस्त फीचर्स, चांगले मायलेज अशा विशेषता असणाऱ्या गाड्या भारतीय कार मार्केटमध्ये चालतात. दरम्यान भारतीय ग्राहकांची हीच पसंत लक्षात घेऊन टाटा कंपनीने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी टाटा पंच लॉन्च केली आहे.
ही कंपनीची एक बजेट फ्रेंडली कार असून यामध्ये अनेक भन्नाट फीचर्स तुम्हाला पाहायला मिळतात. ही गाडी जेव्हापासून लॉन्च झाली आहे तेव्हापासूनच चर्चेत आहे. दरम्यान आता याच गाडीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
काय बदल झालेत
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आधी टाटा पंच च्या टॉप व्हेरियंटमध्येच इलेक्ट्रिक सनरूफ मिळत होते. पण आता टाटा मोटर्स ने एक मोठा निर्णय घेतला असून Tata Punch कारच्या Adventure Persona या लोअर व्हेरियंटमध्येही कंपनीने थेट सन रुफची सोय करून दिली आहे.
यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना कमी किमतीत सनरूफ असणारी कार खरेदी करता येणार आहे. तसेच, कंपनीने याच्या दुसऱ्या व्हेरियंट्समध्येही वेगवेगळे नवीन फिचर्स अॅड केले असल्याची माहिती समोर आली आहे. पण, याच्या पॉवरट्रेनमध्ये अर्थातच इंजिन मध्ये कंपनीने कोणताही बदल केलेला नाही.
या कारच्या बाह्य रुपातही कोणता बदल करण्यात आलेला नाही. खरतर ही गाडी भारतीय ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. यां गाडीत 10.25 इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळणार आहे. या इन्फोटेन्मेंट सिस्टिमला वायरलेस अँड्रॉईड आणि अॅपल कार प्लेचा सपोर्ट आहे.
यासह कारच्या सर्व व्हेरियंट्समध्ये वायरलेस चार्जर, ग्राँड कंसोलसह आर्मरेस्ट, रियर एसी व्हेंट्स, टाइप सी फास्ट USB चार्जर मिळणार आहे. या गाडीची किंमत, या गाडीचे लूक, फीचर्स सर्व काही ग्राहकांच्या पसंतीस खरे उतरत आहे.
किंमत काय आहे?
या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.12 लाख रुपये एवढी आहे. म्हणजे या गाडीचे बेस मॉडेल 6.12 लाख रुपयाला मिळते आणि टॉप मॉडेल 9.45 लाख रुपयांना भारतीय कार मार्केटमध्ये उपलब्ध आहे. पण सध्या या गाडीच्या खरेदीवर कंपनीकडून 18 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हजारो रुपये वाचणार आहेत.