Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
Tata Steel Share Price

टाटाच्या ‘या’ कंपनीचा स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मलामाल ! गुंतवणूकदारांसाठी फायद्याची अपडेट

Saturday, February 15, 2025, 5:45 PM by Tejas B Shelar

Tata Steel Share Price : काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. खरंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात दबाव दिसला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण दिसली. बाजारातील या घसरणीचा टाटा स्टील ला सुद्धा फटका बसला आणि या कंपनीचे स्टॉक 1.66 टक्क्यांनी घसरून 134.02 रुपयांवर आलेत.

या स्टॉकची 52 आठवड्याची उच्चांक किंमत 184.60 इतकी राहिली आणि 52 आठवड्याची निच्चांक किंमत 122.62 इतकी राहिली. सध्या टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,67,866 Cr. रुपये इतके आहे. तसेच कंपनीवर 99,392 Cr. रुपये इतकं कर्ज आहे.

Tata Steel Share Price
Tata Steel Share Price

या स्टॉकच्या गेल्या पाच वर्षांमधील कामगिरी बाबत बोलायचं झालं तर पाच वर्षातील याची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. पण, गेल्या 5 दिवसात टाटा स्टील लिमिटेड कंपनी स्टॉक -0.84 टक्क्यांनी घसरला आहे. पण मागील 1 महिन्यात टाटा स्टील लिमिटेड कंपनी स्टॉक 5.92 टक्क्यांनी वधारला आहे.

मागील 6 महिन्यात टाटा स्टील लिमिटेड कंपनी स्टॉक-10.37 टक्क्यांनी घसरला आहे. मागील 1 वर्षात टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर -5.08 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच YTD आधारावर टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर 1.99 टक्क्यांनी घसरला आहे.

मागील 5 वर्षात टाटा स्टील लिमिटेड शेअर 208.38 टक्क्यांनी वधारला आहे. तसेव लॉन्ग टर्ममध्ये टाटा स्टील लिमिटेड कंपनी स्टॉक 1828.35 टक्क्यांनी वधारला आहे. दरम्यान टाटा समूहाच्या या स्टॉकबाबत शेअर मार्केटमधील तज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

ब्रोकरेज काय म्हणतं ?

टाटा स्टील लिमिटेडच्या शेअर्सबाबत विश्लेषकांनी दिलेल्या शिफारसी आणि टार्गेट प्राईस अहवालानुसार गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

विश्लेषकांच्या शिफारसी:

टाटा स्टील शेअरसाठी विविध विश्लेषकांनी केलेल्या शिफारसीनुसार फेब्रुवारी महिन्यात 31 विश्लेषकांनी आपले मत नोंदवले आहे. त्यामध्ये 14 विश्लेषकांनी “Strong Buy” (खूप चांगली खरेदी) ची शिफारस दिली आहे. 8 विश्लेषकांनी “Buy” (खरेदी) करण्याचा सल्ला दिला आहे.

8 विश्लेषकांनी “Hold” (स्थिती कायम ठेवावी) करण्याची सूचना केली आहे. 1 विश्लेषकाने “Underperform” (कमजोर कामगिरी) ची शक्यता दर्शवली आहे. मात्र “Sell” (विक्री) ची शिफारस कोणत्याही विश्लेषकाने केलेली नाही. याआधी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्येही विश्लेषकांनी दिलेल्या शिफारसीत मोठा बदल झालेला दिसत नाही.

शेअर टार्गेट प्राईस:

विश्लेषकांनी दिलेल्या अंदाजानुसार टाटा स्टीलच्या शेअरसाठी सरासरी टार्गेट प्राईस ₹151.23 इतकी आहे. स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून या स्टॉकसाठी किमान टारगेट प्राईस ₹115.00 अन कमाल टारगेट प्राईस ₹190.00 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

सध्या हा स्टॉक 134.47 रुपयांवर ट्रेड करतोय. गुंतवणूकदारांसाठी ही माहिती महत्त्वाची असून, टाटा स्टीलच्या शेअर्सवर सकारात्मक वातावरण असल्याचे दिसून येत आहे. मात्र, शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य अभ्यास आणि सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Categories स्पेशल Tags Tata Steel Share, Tata Steel Share Price, Tata Steel Share Price News, Tata Steel Share Price Update, Tata Steel Share Update
77 पैशांचा ‘हा’ पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत ! यापूर्वी गुंतवणूकदारांना दिलाय 2466% परतावा
IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 457 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress