Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
Tata Steel Share Price

टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, स्टॉकला मिळाली बाय रेटिंग ! तेजीचे कारण काय ?

Tuesday, January 28, 2025, 5:12 PM by Tejas B Shelar

Tata Steel Share Price : भारतीय शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स 407.67 अंकांनी वधारून 75773.84 वर खुला झाला अन एनएसई निफ्टी सुद्धा वधारले.

निफ्टी 59.50 अंकांनी वधारून 22888.65 वर खुला झाला. खरे तर गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

Tata Steel Share Price
Tata Steel Share Price

नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीपासूनचं शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत असून या चढ-उताराच्या काळात सुद्धा शेअर मार्केटमध्ये काही स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतांना दिसतील असे बोलले जात आहे.

टाटा स्टील चा शेअर देखील आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असे बोलले जात आहे. आज हा स्टॉक 128.91 रुपयांवर ट्रेड करतोय. आज या स्टॉक मध्ये 1.97 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

अशातच, जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे. अशा स्थितीत आज आपण टाटा स्टील शेअरची सध्याची रेंज काय आहे आणि यासाठी ब्रोकरेज फर्मने काय टार्गेट प्राईज दिली आहे याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

टाटा स्टील शेअरची सध्याची स्थिती काय आहे?

टाटा स्टील कंपनी लिमिटेड शेअरची प्रिव्हियस क्लोजिंग प्राईस 126.37 रुपये एवढी राहिली अन आज दिवसभरात टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे शेअर 124.74 – 129.09 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होते. या शेअरचा 52 आठवड्याचा उच्चांक हा 184.60 इतका राहिला आहे आणि शेअर चा 52 आठवड्याचा निच्चांक 122.62 इतका राहिला आहे. मागील 1 वर्षाच्या कामगिरी बाबत बोलायचं झालं तर टाटा स्टील लिमिटेडच्या शेअरची ट्रेडींग रेंज 122.62 ते 184.60 रुपयांच्या दरम्यान राहिलीये. सध्या या कंपनीचे मार्केट कॅप 1,60,913 कोटी रुपये एवढे आहे. तसेच सध्या कंपनीवर 99 हजार 392 कोटी इतके कर्ज आहे. दरम्यान टाटा स्टील कंपनीच्या तिमाही निकालात कंपनीचा नफा 43 टक्क्यांनी घटलाय.

टाटा स्टीलने गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षात किती परतावा दिलाय?

शेअर बाजारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मागील 5 दिवसात टाटा स्टील लिमिटेडचा शेअर 0.40 टक्क्यांनी वधारला आहे. पण, मागील 1 महिन्यात टाटा स्टील कंपनी लिमिटेड शेअर 5.82 टक्क्यांनी घसरला आहे. मागील 6 महिन्यात टाटा स्टील कंपनी लिमिटेड शेअर 20.85 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच मागील 1 वर्षात टाटा स्टील कंपनी लिमिटेड शेअर -4.51 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच YTD आधारावर टाटा स्टील कंपनी लिमिटेड शेअर -5.73 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, मागील 5 वर्षात टाटा स्टील कंपनी लिमिटेड शेअर 205.62 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच, लॉन्ग टर्ममध्ये टाटा स्टील कंपनी लिमिटेड शेअर 1,754.82 टक्क्यांनी वधारला आहे.

ब्रोकरेज फर्म काय म्हणतंय?

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने या कंपनीवर विश्वास दाखवला असून आगामी काळात यामध्ये तेजी येण्याचे संकेत दिले आहेत. या शेअरला ओवर वेट रेटिंग देण्यात आली आहे. या ब्रोकरेज फर्मने या शेअर साठी 155 रुपयांचे टारगेट प्राईस दिले आहे. मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मने मात्र या शेअर साठी इक्वल वेट रेटिंग दिली आहे. तसेच या ब्रोकरेजने 160 रुपयांचे टार्गेट प्राईज सुद्धा दिले आहे.

Categories स्पेशल Tags Tata Steel Share Price
Amazon वर स्वस्तात मिळतोय Oneplus 13R !
EPFO चा गेम चेंजर निर्णय! कुठल्याही कागदपत्रांशिवाय तुमच्या ‘या’ माहितीत करा बदल
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress