Tata Tigor Facelift : ज्या लोकांना नवीन कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हालाही येत्या काही दिवसांनी नवीन गाडी खरेदी करायची असेल तर टाटा कंपनीने तुम्हाला एक मोठी भेट दिली आहे. Tata Tigor चे नवीन मॉडेल बाजारात दाखल झाले आहे. यामुळे सब-कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये अधिक चुरस निर्माण झाली असल्याचे दिसत आहे.
जर तुम्हाला टाटा कंपनीचीचं Sedan कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हे नवीन अपडेट फायद्याचे ठरणार आहे. खरे तर Tata Tigor फेसलिफ्ट मॉडेलच्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होत्या. अखेर कार 2025 च्या सुरुवातीलाच कंपनीने टाटा टिगोर फेसलिफ्ट लॉन्च केली असून या लॉन्चिंग मुळे आता सब-कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झालेली आहे.
![Tata Tigor Facelift](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Tata-Tigor-Facelift.jpeg)
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या वर्षाच्या शेवटी मारुती सुझुकी डिझायर आणि होंडा अमेझच्या नवीन जनरेशन मॉडेल्स लाँच होणार आहेत, तर 2025 च्या सुरुवातीलाचं टाटा टिगोर फेसलिफ्टसह बाजारात दाखल झाली आहे. पण यातील डिझायर आणि अमेझ पूर्णपणे नवीन पिढीतील मॉडेल्स असतील, तर टिगोरला मुख्यतः फेसलिफ्ट आणि अधिक प्रीमियम वैशिष्ट्ये मिळाली आहेत.
यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे XZ Plus Lux नावाच्या नव्या टॉप व्हेरिएंटची भर, ज्याची किंमत 8.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. दरम्यान आता आपण टाटाच्या या फेसलिफ्ट मॉडेलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या गाडीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन तसेच या गाडीची प्राईस रेंज कशी आहे याची आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कशी आहे Tata Tigor Facelift
नवीन टिगोर XZ Plus Lux मध्ये अधिक प्रीमियम लुक आणि फिचर्स मिळाले आहेत. यामध्ये १५-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स (फक्त पेट्रोल व्हेरिएंटसाठी), फ्रंट फॉग लॅम्प, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटो-फोल्ड ओआरव्हीएम, शार्क फिन अँटेना आणि क्रोम-लाइन असलेले डोअर हँडल यासारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
त्यामुळे गाडीचा लुक अधिक स्टायलिश आणि आकर्षक झाला आहे. गाडीच्या इंटीरियरमध्येही काही महत्त्वाचे अपडेट्स करण्यात आले आहेत. यात 10.25-इंचाचा फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (हरमनकडून, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्टसह), ४ ट्विटर्ससह ऑडिओ सिस्टम, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, लेदर-रॅप्ड स्टीअरिंग व्हील आणि कूल्ड ग्लोव्ह बॉक्स देण्यात आला आहे.
याशिवाय, फ्रंट टाइप-सी चार्जिंग पोर्ट, व्हॅनिटी मिरर आणि मॅगझिन पॉकेट्सही आहेत, ज्यामुळे केबिन अधिक आरामदायक आणि युजर-फ्रेंडली बनले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही नवीन टिगोर अधिक प्रगत बनली आहे.
यात 360-डिग्री कॅमेरा सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) आणि हिल होल्ड कंट्रोल (HHC) यासारखी अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे गाडी अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनली आहे.
इंजिन कसे आहे?
इंजिन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत, 2025 टाटा टिगोर XZ Plus Lux मध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 85bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. त्याच वेळी, त्याचा CNG व्हेरिएंट 72bhp पॉवर आणि 95Nm टॉर्क प्रदान करतो. दोन्ही प्रकार फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येतात, तर AMT पर्याय इतर व्हेरियंट्समध्येच उपलब्ध आहे.
नव्या मॉडेलची किंमत किती?
किंमतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, पेट्रोल XZ Plus Lux व्हेरिएंटची किंमत 8.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर CNG XZ Plus Lux व्हेरिएंटची किंमत 9.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. जर तुम्ही सुरक्षितता, प्रीमियम फीचर्स आणि प्रगत तंत्रज्ञानासह बजेट-फ्रेंडली सेडान शोधत असाल, तर टिगोर XZ Plus Lux हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. डिझायर आणि अमेझ यांच्यासोबत ती स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहे.