Tesla Car News : गेल्या अनेक दिवसांपासून भारतात टेस्ला कंपनीच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. खरंतर ही अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी भारतात भव्य शोरूम चे उद्घाटन करणार होती. दरम्यान आता कंपनीकडून भारतातील पहिले भव्य शोरूम आज अखेरकार खुले करण्यात आले आहे.
कंपनीचे भारतातील पहिले शोरूम देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत ओपन झाले आहे. कंपनीने आज 15 जुलै 2025 रोजी राजधानी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आपल्या पहिल्या शोरूमच्या उद्घाटनासह त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार मॉडेल वाय अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केली आहे.

या शोरूमचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आज कंपनीकडून Tesla मॉडेल य अधिकृतपणे भारतात विक्रीसाठी लॉन्च करण्यात आली आहे. एवढेच नाही तर या गाडीची बुकिंग सुद्धा ऑफिशिअली सुरू करण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण कंपनीची ही इलेक्ट्रिक कार कशी आहे ? या गाडीचे फीचर्स, स्पेसिफिकेशन, इंजिन तसेच गाडीच्या किमती बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टेस्ला मॉडेल Y चे फिचर्स अन स्पेसिफिकेशन
टेस्ला मॉडेल Y चा रियर व्हील ड्राइव्ह प्रकार भारतीय बाजारात दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह म्हणजे 60 kWh आणि मोठा 75 kWh बॅटरी पॅक या प्रकारात सादर करण्यात आला आहे. या गाडीच्या RWD प्रकारात एकच इलेक्ट्रिक मोटर आहे, जी सुमारे 295 hp ची पॉवर जनरेट करते.
याशिवाय, 60 kWh बॅटरी एका चार्जवर 500 किमी ड्रायव्हिंग रेंज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे 75 kWh प्रकारातील कार 622 किमी ड्रायव्हिंग रेंज देते असे कंपनीचे म्हणणे आहे. टेस्ला मॉडेल Y एकूण 7 वेगवेगळ्या बाह्य रंग पर्यायांसह आणि 2 अंतर्गत ट्रिमसह उपलब्ध करण्यात आली आहे.
या कारमध्ये 15.4-इंच फ्रंट इन्फोटेनमेंट डिस्प्ले, 8-इंच रियर स्क्रीन, पॉवर-अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स आणि स्टीअरिंग कॉलम, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 19-इंच क्रॉसफ्लो व्हील्स,
फिक्स्ड ग्लास रूफ आणि पॉवर रिअर लिफ्टगेट सारखे भन्नाट फीचर्स देखील या गाडीत उपलब्ध आहेत. या गाडीची बॅटरी सुपर चार्जिंग च्या माध्यमातून फक्त पंधरा मिनिटात चार्ज होईल आणि 238 ते 267 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करता येईल.
किंमत किती ?
मात्र भारतात या गाडीची किंमत फारच अधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत ही गाडी 44 हजार 990 डॉलरच्या सुरुवाती एक्स शोरूम किमतीत म्हणजेच अमेरिकेत या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 38.63 लाख इतकी आहे. मात्र आपल्या भारतात या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ही 59.89 लाख इतकी आहे.
Tesla मॉडेल Y च्या LR-RWD या व्हेरिएंटची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राम सारख्या शहरांमध्ये 67.89 लाख रुपये इतकी आहे. तसेच RWD या व्हेरिएंट ची किंमत मुंबई, दिल्ली गुरुग्राम सारख्या शहरांमध्ये 59.89 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे.
कुठे सुरू झाली बुकिंग ?
या गाडीची अधिकृत बुकिंग सुरू करण्यात आली आहे. सध्या स्थितीला या गाडीची बुकिंग मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राम या शहरांसाठी सुरू करण्यात आली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
या गाडीची जर बुकिंग करायची असेल तर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे लागणार आहे किंवा मुंबई येथील देशातील पहिल्या ऑफलाइन स्टोअरला म्हणजेच टेस्ला एक्सपीरिएंस सेंटरला भेट द्यावी लागणार आहे.