Thane Kalyan Metro : राजधानी मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. शहरातीलं प्रवासाला गती देण्यासाठी मेट्रोचा विस्तार केला जात आहे. दरम्यान ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्ग प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. वास्तविक, ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरा दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि ठाणे ते कल्याण अंतर कमी करण्यासाठी या शहरा दरम्यान मेट्रो मार्ग प्रकल्प उभारण्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून केले जात आहे.
ठाणे, भिवंडी कल्याण या उपनगरातीलं वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतुकीला गती देण्यासाठी हा मेट्रो मार्ग प्रकल्प सुरु केला जात आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक 5 प्रकल्पातीलं पहिल्या टप्प्याचे काम अर्थातच ठाणे ते भिवंडीचे काम सुरू आहे. आता या मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासंदर्भात माहिती हाती आली आहे.
दुसरा टप्पा म्हणजे भिवंडी ते कल्याणचे काम येत्या काही दिवसात सुरू केल जाणार आहे. भिवंडी ते कल्याण मेट्रो मार्गाच्या कामासाठी नुकतीच निविदा जारी करण्यात आली आहे. एमएमआरडीए अर्थातच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून निविदा काढण्यात आली असून ही निविदा प्रक्रिया पार पाडून येत्या चार महिन्यात प्रत्यक्षात या टप्प्याचे कामकाज सुरू करण्याचा मानस प्राधिकरणाने बोलून दाखवला आहे.
या संपूर्ण प्रकल्पाची म्हणजे ठाणे-भिवंडी-कल्याणची लांबी जवळपास 25 किलोमीटर आहे. त्यासाठी 8417 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित अडून दोन टप्प्यात याचे काम केले जाणे प्रस्तावित असून ठाणे भिवंडी काम ऑल रेडी सुरू झाले असून जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता दुसरा टप्पा अर्थातच भिवंडी ते कल्याण याचे काम सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.
निविदा सादर करण्याची शेवटची दिनांक 8 मे ही ठेवण्यात आली असून निविदा प्रक्रिया पार पाडून येत्या चार महिन्यात या दुसऱ्या टप्प्याचे काम प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आली असल्याची माहिती महानगर आयुक्त श्रीनिवासन यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या मेट्रो मार्ग 5 चे विस्तारीकरणाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार आता, ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्ग पाच हा उल्हासनगर पर्यंत विस्तार ला जाणार आहे. याला राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जात आहे. सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केल्यानंतर उल्हासनगर पर्यंतच्या मेट्रो मार्गाची देखील निविदा प्रक्रिया काढली जाईल आणि यानंतर याही टप्प्याचे काम सुरू होईल असं सांगितलं जात आहे.