Thane News : मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. ठाण्यात सुद्धा अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत आणि अजूनही काही रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. दरम्यान ठाण्यात आता एक नवा भुयारी मार्ग विकसित केला जाणार आहे.
या नव्या भुयारी मार्गामुळे घोडबंदर रोड आणि फाउंटन जंक्शनवरील वाहतूक कोंडी लवकरच इतिहासजमा होणार आहे. जे ठाण्यात राहतात त्यांना घोडबंदर रोड आणि फाउंटन जंक्शन वरील वाहतूक कोंडी चांगल्यापैकी ठाऊक असेल.

मात्र आता ही वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर होणार आहे. एमएमआरडीएने या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला असून भुयारी बोगद्याच्या प्रकल्पाला आता गती देण्यात आली आहे.
या भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. दरम्यान आता आपण हा प्रकल्प नेमका कसा राहणार? याचाच एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार प्रकल्प ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गायमुख ते फाऊंटन हॉटेल या प्रकल्पात दोन स्वतंत्र भुयारी बोगदे निर्माण करण्यात येणार आहेत. याप्रकल्पाची एकूण लांबी 5.5 किमी असून अंतर्गंत प्रत्येकी 3.5 किमी लांबीचे दोन बोगदे बांधले जात आहेत. हे बोगदे सहा पदरी बांधण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाचा ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ठाण्यावरून वसई-विरार तसेच भाईंदरकडे जाणाऱ्या प्रवाश्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. ठाण्यावरुन वसई व विरारला जाणे आणखी सोप्पे होणार आहे. यामुळे ठाणे ते वसई व विरारकडील प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.
गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शनबोरबरच भाईंदर ते फाऊंटन हॉटेलपर्यंतही भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यामुळं गायमुख ते वसई भुयारी मार्गाने येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदरला अतिवेगाने जाता येणार आहे.
फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर पर्यंत उन्नत मार्ग बांधण्यासाठी 1,000.00 कोटींचा खर्च येणार आहे. ठाणे घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर पर्यंत उन्नत रस्त्याचे डिझाइन आणि बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे.
नक्कीच या दोन्ही प्रकल्पांमुळे ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही. या प्रकल्पांचे काम आता प्रत्यक्षात सुरू होणार आहे आणि 2017 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होतील अशी आशा आहे.