ब्रेकिंग ! ‘या’ प्रकल्पामुळे ठाणे ते डोंबिवली प्रवास फक्त 20 मिनिटात होणार; ‘या’ वेळी होणार उद्घाटन, मुख्यमंत्रीपुत्र खासदार श्रीकांत शिंदेची माहिती

Thane To Dombivali New Bridge : सध्या राज्यभर वेगवेगळ्या रस्ते विकासाची कामे केली जात असून मुंबई शहर व उपनगरात सर्वाधिक कामे सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहर व उपनगरात वाढणारी लोकसंख्या, वाढणारी वाहनांची संख्या यामुळे वाहतूक कोंडी देखील प्रचंड होऊ लागली आहे. परिणामी स्वप्ननगरी, मायानगरी मुंबई आता वाहतूक कोंडी साठी संपूर्ण जगात ओळखली जात आहे.

सर्वाधिक गर्दीच शहर म्हणून राजधानीला ओळखलं जाऊ लागलं असून यामुळे शहरात आणि उपनगरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चाकरमान्यांना कामाला जाण्यासाठी यामुळे अडथळे येत आहेत. शहरात अपघातांची संख्या देखील वाढू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शासनाकडून केल्या जात आहेत.

याच उपाय योजनेचा एक भाग म्हणून आणि ठाणे ते डोंबिवली चा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी 2013 मध्ये एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. दरम्यान त्यानंतर काही कारणांनी हा प्रकल्प रखडला मात्र आता हा प्रकल्प जलद गतीने सुरू असून येत्या काही दिवसात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक मोठी माहिती दिली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सध्या डोंबिवलीहुन ठाण्याला जाण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरून राजनोली फाट्यामार्गे कोनगाव, दुगार्डी ते कल्याण पूर्वेहून फिरून दीड तासांचा प्रवास करावा लागत आहे.

यामुळेच मोठा गाव ते मानकोली दरम्यान खाडी पूल उभारला जात आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते डोंबिवली हा प्रवास मात्र वीस मिनिटात शक्य होणार आहे. वास्तविक या पुलाचे उद्घाटन हे 2016 मध्ये झाले. पण मध्यंतरी वेगवेगळ्या कारणांमुळे याचे काम रखडले होते.

दरम्यान, आता या पुलाचे 90% काम पूर्ण झाले असून खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा पूल मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवासासाठी खुला होईल असा दावा केला आहे. निश्चितच यामुळे ठाणे ते डोंबिवली हा प्रवास मात्र वीस मिनिटात शक्य होईल आणि प्रवासांचा मोठा वेळ वाचेल, यात तीळ मात्र देखील शंका नाही.