Thanks आणि Thank You मध्ये फरक असतो बरं ; अस्खलित इंग्रजी येणाऱ्यांना देखील माहित नाही ‘हा’ फरक, वाचा..

Thanks आणि Thank You या दोन्ही शब्दांमध्ये मोठा फरक आहे असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. थँक्स आणि थँक यु हे शब्द वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते.

Published on -

Thanks And Thank You Difference : अलीकडे इंग्रजीचा वापर वाढला आहे. कॉर्पोरेट जगतात इंग्रजीचा वापर कॉमन बनलाय. ग्लोबलायझेशनमुळे सर्वच क्षेत्रात इंग्रजीला महत्त्व मिळतंय. आपल्या देशात देखील बहुसंख्य जनता इंग्रजीत संवाद साधते. मात्र, आपल्यापैकी अनेक जण योग्य ठिकाणी योग्य इंग्रजी शब्दांचा वापर करत नाहीत.

जसे की Thanks आणि Thank You हे दोनही शब्द आपण परिस्थिती न पाहता सर्रासपणे वापरतो. आता तुम्ही म्हणाल या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो मग यापैकी कोणताही शब्द वापरला तर काय बिघडतं.

पण हे खरं नाही या दोन्ही शब्दांमध्ये थोडा फरक आहे. थँक्स आणि थँक यु या दोन्ही शब्दांमध्ये नेमका काय फरक आहे हेच आता आपण समजून घेणार आहोत.

Thanks आणि Thank You मधला फरक नेमका काय?

Thanks आणि Thank You या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे याची अनेकांना माहिती सुद्धा नसते. जे लोक अस्खलित इंग्रजी बोलतात त्यांना सुद्धा याची माहिती नाही. खरे तर थँक्स हा एक अनौपचारिक शब्द आहे. मात्र थॅंक यू हा एक औपचारिक शब्द आहे.

याचा वापर औपचारिक ठिकाणी होतो. Thanks हा अनौपचारिक शब्द आहे याचा वापर मित्र, परिवार किंवा जी लोकं चांगली परिचित आहेत त्यांच्याशी संवाद साधताना केला जातो. मात्र आपण असे काही करत नाही.

जी लोक आपल्या ओळखीची आहेत त्यांच्याशी संवाद साधताना सुद्धा हा शब्द वापरतो आणि जी लोक आपल्या ओळखीची नाहीत त्यांच्याशी संवाद साधताना सुद्धा हा शब्द वापरतो. दुसरीकडे Thank You हा एक औपचारिक शब्द आहे.

या शब्दाचा वापर अनोळखी व्यक्ती, वरिष्ठ व्यक्ती किंवा मग व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. थँक यु हा शब्द सन्मान दाखवतो. ज्या व्यक्तीशी संवाद साधताना आपण हा शब्द वापरतो त्या व्यक्तीच्या विषयी आपल्या मनात सन्मान आहे हे या शब्दातून अधोरेखित होते.

Thanks हा शब्द आपलेपणा दाखवतो आणि म्हणूनच नेहमी जवळच्या व्यक्तींशी संवाद साधताना या शब्दाचा वापर केला जातो. मराठीत Thanks साठी धन्यवाद आणि थॅंक यू साठी आभार असे शब्द वापरले जातात. म्हणजेच धन्यवाद हा अनौपचारिक शब्द आहे आणि आभार हा औपचारिक शब्द आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe