Pm Kisan Yojana : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ही बातमी पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खास ठरणार आहे. कारण की पीएम किसानच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही शासनाने 2019 मध्ये सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातोय. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काळात या योजनेच्या रकमेत मोठी वाढ होणार असा पण दावा केला जातोय. या योजनेची रक्कम 6,000 रुपयांवरून 12,000 करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारकडून घेतला जाईल अशी माहिती मध्यंतरी समोर आली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या येत्या अधिवेशनात या संदर्भातील निर्णय होईल असा पण दावा केला जातोय. दुसरीकडे आता पीएम किसानच्या पुढील हप्त्याची तारीख समोर आली आहे.
शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेत 21 हप्ते
पीएम किसानच्या लाभार्थ्यांना आत्तापर्यंत शासनाच्या माध्यमातून 21 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. या योजनेचा 21 वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात वितरित करण्यात आला असून आता 22 वा हप्ता नवीन वर्षात जमा केला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 1 फेब्रुवारी 2026 पासून केंद्रीय विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच पीएम किसान च्या लाभार्थ्यांना पुढील हफ्त्याचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये केला जातोय. मात्र पीएम किसानच्या पुढील हत्याबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून किंवा कृषी विभागाकडून कोणतीच अधिकृत माहिती अथवा निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

खरंतर, पीएम किसानचा हप्ता जारी करण्याआधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर याचे नोटिफिकेशन काढले जाते. मात्र, अजून पुढील हफ्त्याचे नोटिफिकेशन वेबसाईटवर लाईव्ह झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटकडे लक्ष ठेवणे आवश्यक असेल. दुसरीकडे, अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ करण्याबाबत सुद्धा विचार होईल अशा चर्चा पण आहेत. यामुळे, आता अर्थसंकल्पात या संदर्भात काही सकारात्मक निर्णय होणार का? आणि पीएम किसानचा 22 वा हप्ता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.