महाराष्ट्रात नाही तर ‘या’ राज्यात आहे भारतातील सर्वाधिक मोठा जिल्हा ! जिल्ह्याचे क्षेत्रफळ 8 राज्यांपेक्षा अधिक

Indias Big District : भारतात शेकडो जिल्हे अस्तित्वात आहेत. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. यामधील काही जिल्हे हे श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीत सुद्धा आहेत. पण भारतातील सर्वाधिक मोठा जिल्हा कोणता याबाबत तुम्हाला माहिती आहे का ? खरेतर, देशभरातील विविध राज्यांमधील प्रत्येक जिल्ह्यांचे क्षेत्रफळ वेगवेगळे आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील काही जिल्हे फारच लहान आहेत तर काही जिल्हे फारच मोठे आहेत. दरम्यान आज आपण देशातील सर्वात मोठ्या जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत. खरंतर हा जिल्हा नेहमीच चर्चेत राहतो कारण म्हणजे हा जिल्हा देशातील तब्बल नऊ राज्यांपेक्षा मोठा आहे.

हा आहे भारतातील सर्वात मोठा जिल्हा

गुजरातमधील कच्छ जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. विशेष म्हणजे, कच्छचे क्षेत्रफळ इतके प्रचंड आहे की ते भारतातील तब्बल 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपेक्षा मोठे आहे. त्यामुळे “एक जिल्हा इतका मोठा कसा असू शकतो?” असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडणे स्वाभाविक आहे. दरम्यान हा जिल्हा त्याच्या आकारमानामुळे नेहमीच चर्चेत राहतो. कच्छ जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 45 हजार 674 चौरस किलोमीटर इतके आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा असा जिल्हा आहे जो की हरियाणा, केरळ, गोवा , दिल्ली, पुदुच्चेरी, चंदीगड, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार यापेक्षा अधिक मोठा आहे. त्यामुळे कच्छ हा भारतातील सर्वाधिक मोठा जिल्हा ठरतो तर जगातील सर्वाधिक मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. कच्छ जिल्हा केवळ क्षेत्रफळामुळेच नव्हे तर त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि अनोख्या संस्कृतीमुळेही सुद्धा संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे.

येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रण ऑफ कच्छ, ज्याला जगातील सर्वात मोठे मिठाचे वाळवंट म्हणून ओळखले जाते आणि येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील फारच अधिक आहे. पांढऱ्या मिठाच्या चादरीसारखा दिसणारा हा परिसर पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतो यामुळे येथे भारतासहित सबंध जगभरातील पर्यटक दरवर्षी लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. दरवर्षी येथे भरवला जाणारा रण उत्सव देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो.

१ मे १९६० रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार मुंबई राज्याचे विभाजन होऊन गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये अस्तित्वात आली. त्यानंतर कच्छ जिल्हा गुजरात राज्याचा भाग बनला. सध्या कच्छ हा गुजरातच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे २३.२७ टक्के भाग व्यापतो. या जिल्ह्याचा समुद्रकिनारा सुमारे ४०६ किलोमीटर लांबीचा आहे.

भूज हे कच्छ जिल्ह्याचे मुख्यालय असून, जिल्ह्यात ९३९ गावे, ६ नगरपालिका आणि १० तालुके आहेत. जिल्ह्याचा निम्म्याहून अधिक भाग वाळवंटाने व्यापलेला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिले असता कच्छची लोकसंख्या सुमारे २०.९ लाख इतकी आहे. प्रचंड क्षेत्रफळ, रणाचे अद्वितीय सौंदर्य, लोककला, हस्तकला आणि सांस्कृतिक वारसा यांमुळे कच्छ जिल्हा भारताच्या नकाशावर एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करतो.