2026 चा पावसाळा दगा देणार, एल निनोमुळे दुष्काळ पडणार ! Skymet चा अंदाज काय सांगतो?

Published on -

Monsoon 2026 : गेल्या वर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली. पण मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र राज्यात कमी दिवसात जास्त पावसाचे नोंद झाली आणि यामुळे संपूर्ण मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली.

पण गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आणि म्हणूनच आता यावर्षी मान्सून कसा राहणार हा मोठा सवाल उपस्थित होतोय आणि नवीन वर्ष सुरू होतानाच मानसून बाबत एक नवीन माहिती सुद्धा समोर आली आहे. 2026 च्या पावसाळ्याबाबत स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेकडून मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे.

खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये 2026 साली दुष्काळ पडणार अशा चर्चा सुरू आहेत आणि स्कायमेटच्या अंदाजामुळे या चर्चांना अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे. कारण की स्कायमेटने देखील यावर्षी पावसाळ्यात अपेक्षित पाऊस होणार नसल्याचे भाकीत वर्तवले आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रासह संबंध देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. पण स्कायमेटचा अंदाज नेमका काय? यावर्षी मानसून काळात पाऊस का कमी पडणार याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

स्कायमेटचा अंदाज काय सांगतो?

मंडळी नव्या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच पावसाने सरप्राईज दिलं. नव्या वर्षाच्या सुरुवातीला राजधानी मुंबईत अचानक पाऊस झाला. कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मध्ये देखील पावसाळी वातावरण अनुभवायला मिळाले. दरम्यान या वर्षात पाऊस आणखी एक नवीन सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे. मान्सून 2026 बाबत स्कायमेट कडून एक नवीन अंदाज वर्तवण्यात आला आहे ज्यामध्ये हे वर्ष दुष्काळाच्या सावटाखाली जाऊ शकते असा अंदाज आहे. यावर्षीच्या मान्सूनवर एल निनोचे सावट राहू शकते असा अंदाज आहे

आणि यामुळे मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा येण्याची शक्यता तयार होत आहे. हवामान अंदाज वर्तवणारी खासगी संस्था स्कायमेटकडून याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. दरम्यान स्कायमेटच्या या अंदाजाने सध्या सबंध महाराष्ट्रभर चिंतेचे वातावरण आहे. हवामान तज्ज्ञ महेश पलावतने सांगितल्याप्रमाणे गेल्या मान्सूनवर ला निनाचा प्रभाव होता. अजूनही प्रशांत महासागरात ला निनाची स्थिती आहे, यामुळे आतापर्यंत देशात चांगला पाऊस झाला आहे. पण आता ही परिस्थिती बदलू शकते आणि याचा थेट परिणाम मान्सूनवर होणार आहे. खरे तर प्रशांत महासागराचे तापमान जेव्हा वाढते तेव्हा एलनिनूची स्थिती तयार होते.

आता प्रशांत महासागराचे तापमान कमी आहे. हे मार्च 2026 पर्यंत सामान्य स्थितीत जाऊ शकते. मात्र मार्चनंतर ही स्थिती हळूहळू बदलेला आणि तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशांत महासागरातील तापमानात वाढ झाली की तिथे एलनिनो ही स्थिती तयार होईल ज्याचा थेट फटका भारतीय मानसून ला सहन करावा लागणार आहे. प्रशांत महासागरात एलनिनो ची स्थिती तयार झाल्यानंतर नैऋत्य मानसून प्रभावित होतो आणि मान्सून काळात कमी पाऊस पडतो किंवा दुष्काळ सदृश्य स्थिती तयार होते.

मे, जून आणि जुलै या काळात प्रशांत महासागरातील तापमानात वाढ होत जाणार आहे आणि तेव्हा पुन्हा एल निनोची स्थिती तयार होण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होईल. एल निनोमुळे 2026 मध्ये मानसून काळात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

मात्र स्कायमेटकडून देण्यात आलेला हा अंदाज प्राथमिक स्वरूपातला आहे आणि जेव्हा हवामान खात्याचा पहिला अंदाज समोर येईल तेव्हाच याबाबतची योग्य ती स्थिती क्लियर होऊ शकणार आहे. भारतीय हवामान खाते एप्रिलमध्ये मान्सून 2026 संदर्भातील आपला पहिला अहवाल किंवा अंदाज जारी करणार आहे आणि तेव्हाच याबाबत योग्य ती माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News