नव्या मूर्तीपुढे विराजमान होईल रामलल्लाची जुनी मूर्ती

Ahilyanagarlive24 office
Published:

Ayodhya News : नव्या मंदिरात रामलल्लाची काळ्या ‘पाषाणातील नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आतापर्यंत पुजण्यात येत असलेल्या जुन्या मूर्तीचे काय होईल, असा प्रश्‍न उपस्थित होत होता.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्‍वस्त गोविंद देव गिरी यांनी या प्रश्‍नाचे उत्तर देत जुनी मूर्ती नव्या मूर्तीच्या पुढे ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

रामलल्लाची मूळ मूर्ती धातूची असून, ती अवघ्या अर्ध्या फुटाची आहे. रामलल्ला विराजमान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मूर्तीची गत ७० वर्षांपासून पूजा करण्यात येत आहे. मूळ मूर्तीच्या छोट्या आकारामुळे तिचे भाविकांना २५ ते ३० फूट अंतरावरून दर्शन होऊ शकणार ताक त्यामुळे नवी मूर्ती बनवण्यात आल्याचे गिरी यांनी नव्या मूर्तीसोबतच जुनी मूर्तदेखील महत्त्वाची आहे.

मूर्ती नव्या मूर्तीच्या पुढे ठेवण्यात येणार आहे. या मूर्तीसोबतच लक्ष्मण, भरत व शत्रुध्न तसेच हनुमान यांच्या मूर्तीदेखील गाभाऱ्यात ठेवण्यात येणार आहेत. ट्रस्ट राम मंदिरासाठी घडवण्यात आलेल्या तीनपैकी एका मूर्तीची निवड केली. त्यामुळे उर्वरित दोन मूर्तींचे काय, असा प्रश्‍न विचारला असता गिरी यांनी इतर दोन मूर्तीनादेखील मंदिरात ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

दोनपैकी एक मूर्ती ट्रस्टच्या ताब्यात असेल. कारण या मूर्तीच्या मदतीने रामलल्लाचे कपडे, दागिने यांचे मोजमाप घेण्यात येईल, असे गिरी यांनी स्पष्ट केले. राममंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत ११०० कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. मंदिराचे बांधकाम अद्याप अपूर्ण असून, त्यासाठी अजून ३०० कोटी रुपयांचा खर्च येईल, अशी माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली.

अयोध्येत महाराष्ट्राच्या सुंद्रीसह ५० वाद्यांचा ‘मंगलध्वनी’

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी सोमवारी संपूर्ण परिसर ‘मंगल ध्वनी’ने घुमणार आहे. महाराष्ट्रातील सुंद्री आणि उत्तरप्रदेशच्या बासुरी व ढोलकीसह देशभरातील जवळपास ५० विविध शास्त्रीय व अन्य वाद्य वाजवले जाणार आहेत.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातपूर्वी सकाळी १० वाजेपासून जवळपास दोन तास कर्णमधूर संगीताने संपूर्ण परिसर संगीतमय होईल. भक्तिरसाने ओथंबलेल्या ‘मंगल ध्वनी’ कार्यक्रमानंतर प्राणप्रतिष्ठेचा अभूतपूर्व सोहळा पार पडणार आहे.

‘मंगल ध्वनी’ हा कार्यक्रम प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वपूर्ण औचित्याचे प्रतीक आहे. याद्वारे प्रभू रामाच्या सन्मानात विविध परंपरांना एकजूट केले जाईल, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने रविवारी सांगितले.

अयोध्येतील प्रख्यात कवी यतीन्द्र मिश्र यांनी “मंगल ध्वनी’कार्यक्रमाची कल्पना मांडली आहे. नवी दिल्लीतील केंद्रीव संगीत नाटक अकादमीने या कार्यक्रमात सहकार्य केले आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी जवळपास दोन तास संपूर्ण परिसरात विविध शास्त्रीय व अन्य वाद्यांचे संगीत स्वर घुमणार आहेत.

या वाद्यांमध्ये उत्तरप्रदेशातील बासुरी आणि ढोलक, महाराष्ट्रातील सुंद्री, कर्नाटकातील वीणा, पंजाबमधील अलगोजा, ओडिशातील मर्दला, मध्यप्रदेशातील संतूर, मणिपूरमधील पुंग, आसाममधील नगाडा व काली, छत्तीसगडमधील तंबुरा,

बिहारमधील पखावज, दिल्लीतील शहनाई, राजस्थानातील रावणहत्था, पश्‍चिम बंगालमधील श्रीखोल व पणी आंध्रप्रदेशातील घटम, झारखंडमधील सितार, तामिळनाडूतील नादस्वरम व मृदंग आणि उत्तराखंडमधील हुडका या वाद्यांचा समावेश आहे.

प्रमुख अतिथींसाठी ‘महाप्रसाद’ तयार

अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य-दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणाऱ्या देशभरातील प्रमुख अतिथींना महाप्रसाद दिला जाणार आहे. शुद्ध बनवलेल्या महाप्रसादाची २० हजारांहून पाकिटे तयार करण्यात आलेली आहेत.

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली धील भगवान सेना भारती गरवी व संत सेवा कडून हा महाप्रसाद तयार करण्यात आला शुद्ध देशी तूप, पाच प्रकारचा सुका मेवा, साखरआणि बेसन पिठापासून महाप्रसादाचे लाडू तयार करण्यात आले आहेत. जवळपास २०० लोकांच्या चमूने ५ हजार किलोग्रॅम साहित्य वापरून हा महाप्रसाद तयार केला आहे.

महाप्रसादाचे २० हजारहून अधिक पाकिटे ट्रस्टकडे सोपविण्यात आली आहेत. प्रत्येक ‘पाकिटमध्ये दोन लाडू, शरयू नदीचे पाणी, अक्षता, सुपारीचे ताट आणि कळवा यांचा समावेश आहे. याशिवाय ट्रस्टकडून सोहळ्यासाठी आलेल्या संतांसाठी दररोज जेवणाची व्यवस्था केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe