Ajab Gajab News : पिरॅमिड ही 1 इजिप्त संस्कृतीची खासियत म्हणून गणली जाते. मात्र इंडोनेशियाच्या भूभागावर इजिप्तच्या या खास वास्तूपेक्षा जुना पिरॅमिड असल्याची माहिती पुढे आली आहे. इंडोनेशियात जगातला सर्वात प्राचीन असा पिरॅमिड आहे.
महत्त्वाचे म्हणजे हा पिरॅमिड जमिनीखाली आहे. आजवरचे सर्व पिरॅमिड जमिनीच्या वर बांधण्यात आले आहेत.

इजिप्तमधला गिझाचा पिरॅमिड सर्वात प्राचीन मानला जातो. तितकीच प्राचीन संस्कृती ब्रिटनच्या पाषाण युगाची मानली जाते. मात्र प्राचीनत्वात या दोघांना इंडोनेशियाचा पिरॅमिड मागे टाकण्याची शक्यता आहे.
इंडोनेशियातील या पिरॅमिडला ‘गुनूंग पडांग’ असे संबोधले जाते. जावाच्या पश्चिमेकडील भागात मोठ्या प्रमाणावर डोंगराळ परिसर आहे. या भागात प्राचीन शिळा आहेत. या शिळांना स्थानिक आदिवासी पूजतात. त्यांना ‘पुन्डेन बेरुंडक’ असे म्हटले जाते.
याचा अर्थ पिरॅमिडमध्ये तुम्ही प्रवेश करून हळूहळू त्याच्या छताकडे जात आहात. हा पिरॅमिड मानव शेती करू लागला, त्या काळातला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पिरॅमिडची अजून व्याप्ती समजली नसली तरी वैज्ञानिक आधुनिक उपकरणांच्या मदतीने त्याची मोजणी करत आहेत.
स्थानिक भाषेत या पिरॅमिडला ‘ज्ञानाचा पर्वत’ म्हणून ओळखले जाते. गुनुंग डांगच्या विस्तृत अभ्यासावरून तिथे लाव्हा रसाची नैसर्गिक टेकडी तयार झाल्याचे दर्शवते. त्यानंतर प्राचीन मानवाने तिथे पिरॅमिडसदृश संरचनेच्या गाभ्यात सूक्ष्म शिल्पे कोरली.
रेडिओकार्बन डेटिंगच्या माध्यमातून या पिरॅमिडचे प्रारंभिक बांधकाम शेवटच्या हिमनदीच्या काळात सुरू झाल्याचे दिसते. थोडक्यात, २७ हजार वर्षांपूर्वीची ही वास्तू असावी, असा कयास व्यक्त केला जातो.
२०११ ते २०१५ या दरम्यान पिरॅमिड परिसरात अनेक उपकरणांच्या मदतीने माहिती घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. इंडोनेशियाच्या राष्ट्रीय संशोधन मंडळाचे प्रमुख डॅनी हिलमन नॅटविड्जाजा यांच्या देखरेखीखाली काही पुराणवस्तू संशोधक, भूभौतिक तज्ज्ञ यांच्या पथकाने या परिसरात रडार, डील अशा अनेक उपकरणांच्या मदतीने पाहणी केली.
नॅटविड्जाजा आणि इतर संशोधकांना असे आढळून आले की, गनुंग पडांग जटिल आणि अत्याधुनिक टप्प्यात तयार केले गेले आणि त्याचा सर्वात खोल भाग ३० मीटर खाली आहे. संरचनेचा मुख्य भाग बहुधा २५,००० आणि १४,००० ख्रिस्त पूर्व दरम्यान तयार केला गेला होता,
तथापि, तो नंतर अनेक सहस्राब्दीसाठी सोडून देण्यात आला. गुनुंग पडांग येथील युनिट तीन आणि युनिट दोनचे बांधकाम करणाऱ्यांकडे उल्लेखनीय दगडी बांधकाम करण्याची क्षमता असावी. मात्र ही गोष्ट इंडोनेशियाच्या त्यावेळच्या पारंपरिक शिकारी-संकलक संस्कृतींशी जुळत नाही, असे संशोधकांच्या टीमने सांगितले.