Toyota Fortuner Price : सध्या सर्व पेट्रोल-डिझेल कारवर 18 टक्के ते 28 टक्के जीएसटी आकारला जातो. हॅचबॅक वाहनांना 18% GST लागू होतो. लक्झरी वाहनांवर २८ टक्के जीएसटीची तरतूद आहे.
कार जितकी मोठी तितका टॅक्स जास्त. त्यामुळे भारतात मोठी कार घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. भारातातील टॅक्स रचना पाहिल्यास क्षणभर विश्वास बसणार नाही. परंतु आपण वास्तवाकडे पाठ फिरवू शकत नाही.
वास्तविक, 24 लाखांची कार घरी पोहोचेपर्यंत 45 लाखांपेक्षा जास्त किंमत होत असते, ग्राहकांना चावी मिळेपर्यंत 24 लाख टोयोटा फॉर्च्युनरची किंमत 45 लाखांहून अधिक कशी झाली याबद्दल माहिती आज आम्ही सांगणार आहोत.
मुंबईतील टोयोटा फॉर्च्युनरच्या एका मॉडेलची किंमत 24.11 लाख रुपये होती, ज्यावर 28 टक्के जीएसटी (14% CGST + 14% SGST) आकारण्यात आला आहे,
जो 6,75,172 रुपये आहे. त्यानंतर या एसयूव्हीमध्ये 22 टक्के (कम्पेन्सेशन सेस) जोडण्यात आले आहे, ज्याची किंमत 5,30,493 रुपये आहे. हे दोन कर जोडले तर 24 लाखांच्या संपत्तीवर केवळ 12 लाख 5 हजार रुपये कर भरला आहे.
जीएसटी आणि भरपाई उपकर लावल्यानंतर, टोयोटा फॉर्च्युनरची किंमत रु. 24.11 लाख वरून रु. 36.17 लाख पर्यंत वाढते. जी त्याची एक्स-शोरूम किंमत आहे. म्हणजेच एकूण 50 टक्के कर जमा झाला आहे.
५०% पर्यंत कर
याशिवाय ग्राहकाला नोंदणीची रक्कम भरावी लागेल. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) नुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नोंदणी शुल्क आकारले जाते, हे ठरवले जाते.
जर आपण महाराष्ट्राबद्दल बोललो, तर मुंबईत टोयोटा फॉर्च्युनरची एक्स-शोरूम किंमत 36.17 लाख रुपये आहे, ज्यावर आरटीओने एकूण 7.57 लाख रुपये कर आकारला आहे. याशिवाय, 1 टक्के TCS लागू करण्यात आला आहे, जो 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारवर आकारला जातो.
यानंतर, विम्यासह इतर शुल्क जोडल्यास, वाहनाची ऑन रोड किंमत 45.06 लाख रुपये होते. अशाप्रकारे, 24.11 लाख रुपयांच्या फॉर्च्युनरवर ग्राहकाला सुमारे 21 लाख रुपयांचा कर आणि आरटीओ भरावा लागतो. जी खूप मोठी रक्कम आहे. तथापि, लहान कारवर भरपाई उपकर कमी आकारला जातो.
लक्झरी वाहनांवर २२% सेस
सध्या सर्व पेट्रोल-डिझेल कारवर 18 टक्के ते 28 टक्के जीएसटी आकारला जातो. हॅचबॅक वाहनांना 18% GST लागू होतो. लक्झरी वाहनांवर २८ टक्के जीएसटीची तरतूद आहे.
याशिवाय सेडानवर 22 टक्के आणि SUV वर 22 टक्के उपकर लावला जातो. एकूण कर पाहिल्यास लक्झरी वाहनांवर एकूण ५० टक्के कर बसतो. आम्ही तुम्हाला सांगतो, कारच्या आकारमानानुसार आणि किंमतीनुसार कर आकारणी निश्चित केली जाते.
कराव्यतिरिक्त वाहनांवर आरटीओ शुल्क आकारले जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नोंदणी शुल्क आकारले जाते. अनेक राज्यांमध्ये लक्झरी वाहनांच्या नोंदणीची किंमत खूप जास्त आहे. जो सतत कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
टोयोटा फॉर्च्युनर किंमत (एक्स-शोरूम) – 24,11,333 रुपये
GST (CGST) 14% – रु 3,37,586
GST (SGST) 14% – रु 3,37,586
कॉम्प सेस (22%) – रु 5,30,493
RTO- रु 7,57,102
डेपो शुल्क- रु. 16,500
अॅक्सेसरीज- रु. 35,853
TCS- रु. 36,170
एक्स्टेंट वॉरंटी- रु 43,645
फास्टॅग- 500 रु
ऑन रोड किमंत – रु 45,06,777