Maharashtra Railway : महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातून धावणाऱ्या एका विशेष एक्सप्रेस ट्रेन ला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन आणि घेतला असून या निर्णयाचा खानदेशातील आणि विदर्भातील प्रवाशांना सर्वाधिक लाभ मिळणार आहे.
खरे तर पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून राजकोट ते मागून नगर दरम्यान विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान आता या विशेष गाडीला फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने सुरू केलेली ही एक साप्ताहिक ट्रेन असून या गाडीला राज्यातील 11 ते 12 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

विदर्भ आणि खानदेशातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर ही गाडी थांबा घेणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याची माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कधीपर्यंत मिळाली विशेष गाडीला मुदत वाढ
राजकोट – महबूबनगर विशेष गाडी आता 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालवली जाणार आहे. त्याचवेळी महबूबनगर – राजकोट विशेष गाडी आता 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत रुळावर धावणार आहे. ही विशेष गाडी राजकोट रेल्वे स्थानकावरून दर सोमवारी दुपारी पावणेदोन वाजता सोडली जाणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी महबूबनगर रेल्वे स्थानकावरून दर मंगळवारी रात्री 11:00 वाजेला सोडली जाणार आहे. ती गाडी खानदेशातील नंदुरबार जळगाव आणि भुसावळ या तीन महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे या गाडीचा खानदेशातील प्रवाशांना मोठा लाभ मिळणार आहे.
कोणकोणत्या स्टेशनवर थांबणार विशेष गाडी
पश्चिम रेल्वे कडून चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील वांकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आनंद, वडोदरा, उधना, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, काचेगुडा, शहादनगर, जडचरला या महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.











