Reliance Share Price : 2025 हे वर्ष शेअर मार्केट साठी फारच निराशाजनक राहिले. गेल्यावर्षी शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता दिसून आली आणि याचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये गेल्या वर्षी पाण्यात गेलेत. दरम्यान नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा शेअर मार्केट पुढे एक मोठा आव्हान उभ राहिल आहे.
व्हेनेझुएला संकटामुळे भारतीय शेअर मार्केट सुद्धा प्रभावित होत असून मार्केटमध्ये सध्या सगळीकडे हा विषय चर्चेचा बनला आहे. व्हेनेझुएला या देशावर अमेरिकेने हल्ला चढवला आहे. तेथील सेना प्रमुख आणि राष्ट्राध्यक्षांना सुद्धा ताब्यात घेतले असल्याची बातमी मध्यंतरी समोर आली होती. दरम्यान या घटनेचा संपूर्ण जगावर परिणाम होतोय.

सगळ्या जगाचे या घटनेकडे लक्ष आहे आणि आता अमेरिका नेमक पुढे काय करणार याकडे वेगवेगळे तर्क वितर्क समोर येत आहेत. खरे तर व्हेनेझुएला हा असा देश आहे जो तेल उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतो. साहजिकच अमेरिकेने या देशावर हल्ला चढवला असल्याने ही बातमी शेअर मार्केट वर सखोल परिणाम करणारी ठरत आहे.
या संकटामुळे काही कंपन्यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव वाढला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत असतानाच आंतरराष्ट्रीय राजकारणातील ही घटना मात्र मुकेश अंबानीच्या रिलायन्स समूहासाठी फायद्याची ठरताना दिसत आहे. कारण की या संकटाच्या काळात मुकेश अंबानी यांच्या एका कंपनीचा स्टॉक चांगलाच तेजीत आला आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा स्टॉक या घटनेमुळे तेजीत आला आहे. आज 5 जानेवारी 2026 रोजी या कंपनीचा स्टॉक शेअर मार्केटमध्ये एक टक्क्यांनी वाढला आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चा स्टॉक 1611 च्या रेंजमध्ये व्यवहार करतोय. दरम्यान यापुढे सुद्धा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ला चांगला फायदा होण्याची आशा जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
व्हेनेझुएलावरील अमेरिकन हल्ल्यानंतर जागतिक तेल बाजारात निर्माण झालेल्या स्थितीचा मुकेश अंबानीच्या या कंपनीला मोठा फायदा होईल असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे व्हेनेझुएलावर अमेरिकेने पूर्णतः नियंत्रण मिळवल्यानंतर त्या देशावर असलेले तेल निर्यातीचे निर्बंध पूर्णपणे हटू शकतात आणि असे झाले तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ला या देशातून स्वस्तात कच्चे तेल उपलब्ध होणार आहे. ब्रँड क्रूडच्या तुलनेत या देशातून रिलायन्स इंडस्ट्रीजला प्रति बॅरल पाच ते आठ डॉलर इतके कच्चे तेल स्वस्त मिळण्याची आशा आहे.
येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यात तर रिलायन्सच्या रिफायनिंग व्यवसायातील ‘ग्रॉस रिफायनिंग मार्जिन’ वाढणार आहे. साहजिकच हे मार्जिन वाढलं तर यामुळे कंपनीच्या महसुलात पण मोठी भर पडणार आहे. दरम्यान आता आपण ब्रोकरेज हाऊस कडून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्स साठी काय टारगेट प्राईस देण्यात आली आहे आणि या शेअरची मागील काही वर्षांमधील कामगिरी कशी आहे याचा आढावा घेऊयात.
ब्रोकरेज हाऊसचा अहवाल काय सांगतो?
स्टॉक एक्सचेंज कडून मिळालेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांच्या काळात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना तब्बल 65% इतके रिटर्न दिले आहेत. तसेच मागील एका वर्षाच्या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के इतके रिटन दिले आहेत.
म्हणजेच मागील काही वर्षांपासून सातत्याने हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरला आहे. दरम्यान आता मार्ग नसते या जागतिक ब्रोकरेज हाऊसने या स्टॉक साठी 1847 रुपयांची टारगेट प्राईस सेट केलेली आहे.











