अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ रेल्वे प्रकल्पाचे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार ! कसा आहे 236 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग ?

अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील वर्षी अगदी सुरुवातीलाच हा रेल्वे प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.

Published on -

Maharashtra Railway : महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. विशेष म्हणजे शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून रेल्वेचे नेटवर्क आणखी वाढवले जात आहे. याचाच भाग म्हणून देशभरातील विविध राज्यांमध्ये नवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. तसेच काही भागात सध्याच्या रेल्वे मार्गांची क्षमता वाढवली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे मार्गाची देखील क्षमता वाढवली जात आहे.

खरे तर रेल्वे कडून मनमाड ते दौंड दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केले जात आहे. हे काम जवळपास गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे आणि आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान या प्रकल्पाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

प्रकल्पाचे काम आले अंतिम टप्प्यात

मनमाड – दौंड रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्पातील मनमाड ते अहिल्यानगर दरम्यानचे 155 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे या मार्गावरून रेल्वे गाड्या सुद्धा धावत आहेत. या दुहेरीकरणाच्या कामामुळे आता रेल्वे गाड्यांना क्रॉसिंग साठी थांबावे लागत नाही आणि म्हणूनच प्रवाशांचा प्रवास वेगवान झाला आहे.

या कामामुळे प्रवासाचा कालावधी दोन तास 38 मिनिटांवरून दोन तासांवर आला आहे म्हणजेच प्रवासाचा कालावधी चक्क 38 मिनिटांनी कमी झाला आहे. तसेच आता याच मार्गावरील आणखी 45 किलोमीटर लांबीचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे पुढील वर्षी एप्रिल पासून या मार्गावर देखील 110 किलोमीटर प्रतितास या वेगाने रेल्वे गाड्या धावताना दिसणार आहेत आणि यामुळे प्रवाशांचा अतिरिक्त अर्ध्या तासाचा वेळ वाचणार आहे.

आधी मनमाड ते अहिल्यानगर हा मार्ग एकेरी होता मात्र 2016 मध्ये या मार्गाचे दुपदरीकरण करण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी आणि अहिल्यानगर येथून हा मार्ग जातो. मनमाड – दौंड दुहेरीकरण प्रकल्प 236 किलोमीटर लांबीचा आहे मात्र यापैकी दोनशे किलोमीटरचा मार्ग हा अहिल्यानगर जिल्ह्यातलाच आहे.

जिल्ह्यातील आणखी एका मार्गाचे दुहेरीकरण होणार

दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी ते पुणतांबा या रेल्वे मार्गाचे देखील दुहेरीकरण केले जाणार असून या दुहेरीकरण प्रकल्पाला नुकतीच केंद्राची मंजुरी मिळाली आहे. पुणतांबा ते शिर्डी हा एकूण 16 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. म्हणजेच दौंड ते मनमाड दरम्यानचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर आगामी काळात पुणतांबा ते शिर्डी या रेल्वे मार्गाचे देखील दुहेरीकरण होणार आहे आणि यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी आशा रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!