जगातील सर्वात दुर्मिळ पांढऱ्या मगरीचा जन्म झाला ! पाहून शास्त्रज्ञही थक्क

Updated on -

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये जगातील सर्वात दुर्मिळ पांढऱ्या मगरीचा जन्म झाला आहे. एका अंड्यातून गुलाबी त्वचा आणि चमकदार निळे डोळे असलेले मगरीचे पिल्लू बाहेर पडताना पाहून शास्त्रज्ञही थक्क झाले. या मादी पिल्लाने नागरिकांची मने जिंकली आहेत.

फ्लोडिया येथील प्रसिद्ध मगरीचे उद्यान गॅटरलँड ऑरलैंडो येथे दुर्मिळ पांढऱ्या ल्युसिस्टिक मगरीचा जन्म झाल्याची माहिती सोशल मीडियातून समोर आली. याबद्दल उद्यान प्राधिकरण खूप आनंदी आहे.

३६ वर्षांपूर्वी लुईझियानामध्ये ल्युसिस्टिक मगरींचे घरटे सापडल्यानंतर अशा प्रकारची मगर जन्मण्याची ही पहिलीच घटना आहे. गॅटरलँड ऑरलैंडोच्या एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे दुर्मीळ आणि जगातील पहिले आहे.

उद्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, जगभरात केवळ सात जिवंत ल्युसिस्टिक मगरी आहेत, त्यापैकी तीन गॅटरलँडमध्ये आहेत. पार्कच्या अधिकाऱ्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकन मगरींमध्ये ल्युसिस्टिक मगर ही अत्यंत दुर्मिळ अनुवांशिक भिन्नता असलेले मगर आहे.

ती अल्बिनो मगरींपेक्षा वेगळी आहे, तिचे डोळे गुलाबी आहेत आणि शरीरावरील रंग पूर्णपणे नष्ट झालेला आहे. मगरींमध्ये ल्यूसिज्म पांढऱ्या रंगाचे कारण आहे. परंतु त्यांच्या त्वचेवर सामान्य रंगाचे ठिपके असतात.

गडद त्वचेशिवाय, त्यांना बऱ्याच काळासाठी थेट सूर्यप्रकाशात जाता येत नाही, कारण या मगरीची त्वचा पांढरी असल्याने तिला उन्हाचे चटके बसतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News