……तर दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांकडून 10,000 रुपयांचा दंड वसूल केला जाणार! दंडापासून वाचण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा

Published on -

HSRP Number Plate : नव्या वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे आणि या नव्या वर्षात अनेकांनी वेगवेगळे संकल्प घेऊन यशस्वी होण्याचा चंग बांधला आहे. त्याचवेळी या नवीन वर्षात सरकारने काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल सुद्धा केलेले आहेत. असाच एक महत्त्वाचा बदल म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून ज्या वाहनांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवलेल्या नसतील त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती. महत्वाची बाब म्हणजे नव्या एचएसआरपी नंबर प्लेट साठी 31 डिसेंबर पर्यंत वेळोवेळी शासनाने मुदत वाढ दिली आणि 31 डिसेंबर ही शेवटची मुदत राहील असा स्पष्ट इशारा सुद्धा दिला होता. मात्र तरीही या मुदतीत अनेकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवलेली नाही आणि आता या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे.

यामुळे जर तुम्हीही अद्याप तुमच्या गाडीला हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवलेली नसेल तर सावध राहा. नवीन वर्षाची सुरुवात तुमच्या खिशाला नक्कीच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कात्री लावू शकते आणि तुमचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. कारण की ही नंबर प्लेट ज्या गाडीवर नसेल त्या वाहन चालकांकडून थेट 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्यात येणार आहे. यासाठी एक जानेवारी 2026 पासून महाराष्ट्रभर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम सुद्धा सुरू झाली आहे. सरकारने वारंवार एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी वाहनचालकांना मुदतवाढ दिली होती.

आता ही मुदत 31 डिसेंबर रोजी संपली आहे आणि शासनाच्या या सूचनेकडे ज्या लोकांनी दुर्लक्ष केले आहे त्यांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या लोकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवलेली नसेल असे वाहनचालक पहिल्यांदा पकडले गेले असताना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. जे वाहन चालक दुसऱ्यांदा पकडले जातील त्यांना पाच हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. महत्वाची बाब म्हणजे ही नंबर प्लेट ज्या लोकांनी बसवलेली नसेल त्यांना फक्त दंडच भरावा लागणार नाही तर आरटीओची महत्त्वाची कामे सुद्धा अडकण्याची शक्यता आहे.

आरटीओ मधील मालकी हस्तांतरण, पासिंग किंवा फिटनेस सर्टिफिकेट मिळवणे अशा गोष्टी या एका नंबर प्लेटमुळे कठीण होणार आहेत. आता जर तुम्हाला या दंडापासून अन कारवाई पासून वाचायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला ताबडतोब भेट द्या. transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या वाहनाची संपूर्ण माहिती भरून ऑनलाईन फी भरायची आहे. यानंतर तुम्हाला नंबर प्लेट बसवण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करायची आहे. ही बुकिंग पूर्ण झाली की तुम्हाला याची अधिकृत पावती काढायची आहे. आता जर तुमच्याकडे ही पावती असेल तर अशावेळी तुम्ही दंडापासून वाचू शकणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News