Small Business Idea : तुम्हालाही स्वतःचा नवीन बिजनेस सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण अशा एका बिजनेस प्लॅनची माहिती पाहणार आहोत, जो सुरू केल्यास अगदी पहिल्या दिवसापासूनच कमाई सुरू होणार आहे. खरंतर अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. विशेषता कोरोना काळापासून देशात नवनवीन व्यवसायांना सुरुवात करण्यात आली आहे.
नवनवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी सरकार सुद्धा इच्छुकांना मदत करत आहे. अशातच जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी पोहा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस प्लॅन फायदेशीर ठरणार आहे. पोहा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस हा असा एक व्यवसाय आहे जो अगदीच कमी गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो आणि पहिल्या दिवसापासूनच यातून कमाई होण्याची शक्यता आहे.

किती गुंतवणूक करावी लागणार ?
पोहा हा एक असा पदार्थ आहे ज्याला बारा महिने मागणी असते. हिवाळा असो, उन्हाळा असो की पावसाळा सर्वच ऋतूंमध्ये पोह्याला बाजारात मागणी असते. आपल्याकडे नाश्त्यासाठी पोह्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे हा बिजनेस कधीच मंदीत येत नाही. म्हणूनच या व्यवसायातून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी जवळपास 2.43 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. महत्त्वाची बाब म्हणजे यापैकी 90% रक्कम तुम्हाला कर्ज स्वरूपात उपलब्ध होऊ शकते. अशा तऱ्हेने तुम्ही हा व्यवसाय फक्त 25 हजार रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करून चांगली कमाई करू शकता.
कोण कोणते मशीन लागणार?
पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठी 500 स्क्वेअर फूटची जागा लागणार आहे. या व्यवसायासाठी पोहा मशीन, भट्टी, पॅकिंग मशीन अशा काही उपकरणांची गरज भासणार आहे. मात्र हे युनिट सुरू केल्यानंतर तुम्हाला सहा लाख रुपयांपर्यंतचा कच्चामाल खरेदी करावा लागणार आहे. या कच्चा मालाचा वापर करून तुम्ही जवळपास 1000 क्विंटल पोह्याची निर्मिती करू शकता.
1000 क्विंटल पोहे तयार करण्यासाठी तुम्हाला साडेआठ लाख रुपयांच्या आसपास खर्च करावा लागणार आहे. याच्या विक्रीतून तुम्हाला जवळपास दहा लाख रुपयांची कमाई होईल म्हणजेच यातून दीड ते दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळू शकतो. या व्यवसायातील मार्जिन हे फार चांगले आहे. यामुळे अनेक जण या व्यवसायाकडे वळत आहेत.