Ahmednagar Picnic Spot : महाराष्ट्र हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. राज्यात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, सह्याद्री, सातपुडा पर्वत रांगा, मुंबईची चमक-धमक, पुण्याच्या ऐतिहासिक वास्तू आणि शालीनता, नागपूरची संत्री, नाशिकच्या द्राक्ष बागा अशा विविध गोष्टी महाराष्ट्रात एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत.
जर तुम्हीही कुठे ट्रीप काढण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. दरम्यान आज आपण राज्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाची माहिती जाणून घेणार आहोत. सह्याद्रीचा प्रत्येक कोपरा पाहण्यासारखा आहे. पण, आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रतनगड विषयी जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला सह्याद्रीचा कणखरपणा पहायचा असेल तर तुम्ही रतनगडला एकदा नक्कीच व्हिजिट केले पाहिजे. येथे गेला तर तुमची संपूर्ण ट्रिप रंजक आणि रोमांचक होणार आहे. रतनगड हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. हा किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे आहे. या किल्ल्याच्या उजवीकडे असणारा सुळका हा खूपच पाहण्यासारखा आहे.
तुम्ही भंडारदराला गेलात तर या किल्ल्याला देखील एकदा अवश्य भेट दिली पाहिजे. हा किल्ला डोळ्यांचे पारणे फेडतो. मात्र येथे खूपच कमी पर्यटक हजेरी लावतात. या पर्यटन स्थळाची अनेकांना माहिती नाहीये. यामुळे रतनगड किल्ल्याला खूपच कमी पर्यटक भेटी देतात. पण, या किल्ल्यावर ट्रेकर्स मोठ्या प्रमाणात येतात. या किल्ल्याला एक आरपार होल आहे.
येथून किल्ल्याच्या दोन्ही दिशेचे दर्शन होते. तुम्ही येथे गेलात तर येथील अमृतेश्वर मंदिर मध्ये जाऊन नक्कीच दर्शन घ्या. येथे दर्शन घेतले तर तुमचा सर्व थकवा दूर होणार आहे. प्रवरा नदीच्या उगमस्थानाजवळ असणारे हे मंदिर एक प्राचीन मंदिर आहे. या किल्ल्यावर तुम्हाला रत्नाई देवीचे मंदिरही दिसेल.
दरम्यान या रत्नाई देवी वरूनच या किल्ल्याला रतनगड म्हणून नाव पडले असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. हा किल्ला हिंदवी स्वराज्यात खूपच महत्त्वाचा मानला जात असे. पेशवाई काळात देखील या किल्ल्याला खूपच महत्व होते. हा किल्ला सह्याद्रीची सुंदरता दर्शवतो. येथे तुम्ही गेलात तर तुम्हाला सह्याद्रीचा मनमोहक नजारा पाहायला मिळणार आहे.
निसर्गाची अप्रतिम कलाकृती आणि या किल्ल्याला लाभलेले ऐतिहासिक महत्त्व पाहता महाराष्ट्रातील अनेक ट्रेकर्स येथे ट्रेकिंगसाठी येत असतात. जर तुमचाही ट्रेकिंगसाठी कुठे बाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. तुम्ही येथे गेलात तर हे ठिकाण तुमच्या मनाला प्रसन्नता देऊन जाणार आहे.