बापरे ! ‘हा’ आहे भारतातील सर्वाधिक वेतन घेणारा एकमेव सीईओ, 82 कोटी रुपये आहे पगार

Ahmednagarlive24 office
Published:
Wipro CEO Thierry Delaporte

प्रत्येक जण नोकरी कशासाठी करतो? तर पैशांसाठी, बरोबर ना ! आलेल्या पैशांत प्रत्येक जण आपली उपजीविका भागवत असतो. सध्या विविध सेक्टरमध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्या असतात. परंतु सध्या भारतात IT क्षेत्रात सर्वाधिक पगार असणारे कर्मचारी आहेत असे म्हटले जाते. येथे लाखो रुपये महिन्याला कमावणारे लोक आहेत. दरम्यान या वर्षी एक नाव पुढे आले आहे की ज्यांची भारतात सर्वात अधिक सॅलरी आहे.

ते म्हणजे विप्रोचे सीईओ थियरी डेलापोर्टे. हे देशातील सर्वाधिक पगार असलेले सीईओ म्हणून आता समोर आले आहेत. विप्रो कंपनीच्या 2023 या आर्थिक वर्षाच्या फाइलिंगमध्ये ही माहिती समोर आली असून डेलापोर्ट यांचा पगार HCL आणि TCS च्या CEO पेक्षाही अधिक आहे. तुम्हालाही उत्सुकता लागली असेल की यांचा पगार किती आहे व ते नेमके कोण आहेत? तर मग चला जाणून घेऊयात

किती कमवतात पगार? कोण आहेत थियरी डेलापोर्टे

विप्रोच्या या आर्थिक वर्षातील काही फाइलिंगनुसार, डेलापोर्टे यांचा पगार वर्षाला 82 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आयटी क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात जास्त पगार घेणारे व्यक्ती आहेत सलील पारेख. ते इन्फोसिसचे सीईओ असून त्यांना वार्षिक 56.45 कोटी रुपये पगार आहे.

थियरी डेलापोर्टे यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला. ते सध्या देशातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोचे सीईओ आहेत. या कंपनीचे व्हॅल्युएशन 93,400 कोटींहून अधिक आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये त्यांचा वार्षिक पगार 82.4 कोटी रुपये असल्याचे काही फायलिंगनुसार समोर आले आहे. ते सध्या 56 वर्षांचे आहेत.

2020 पासून विप्रो सोबत आहेत 

डेलापोर्टे यांना ग्लोबल IT क्षेत्रात तब्बल 30 वसरहनचा अनुभव आहे. त्यांनी जुलै 2020 मध्ये विप्रोची सूत्रे हाती घेतली होती. त्याआधी ते फ्रेंच आयटी कंपनी कॅपजेमिनीमध्ये सीओओ होते. डेलापोर्ट यांच्या एका प्रोफाइलनुसार, त्यांनी पॅरिसमधील सायन्सेस पो या विद्यापीठातून इकॉनॉमी आणि फायनान्समध्ये पदवी प्राप्त केली.

पदवी पूर्ण केल्यानंतर लगेचच जुलै 1992 मध्ये आर्थर अँडरसन अँड कंपनी येथे बाह्य लेखापरीक्षक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. तेथे तीन वर्षे काम केल्यानंतर, ते 1995 मध्ये कॅपजेमिनीमध्ये आले. तेथे जवळपास 25 वर्षे त्यांनी कामकाज सांभाळले. त्यानंतर 2020 मध्ये ते विप्रोला जॉईन झाले. सध्या ते विप्रोत असून सर्वाधिक पगार घेणारे भारतातील सीईओ आहेत.

कशी व कधी झाली होती विप्रोची सुरवात?

विप्रो कंपनी सध्याची अग्रगण्य कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना मोहम्मद प्रेमजी यांनी 1945 मध्ये केली होती. त्यांनी चांगल्या प्रगतीपथावर ही कंपनी आणली. परंतु त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर या कंपनीचे सूत्र अझीम प्रेमजी यांनी हाती घेतले. त्यानंतर कंपनीने कधीही मागे वळून पाहिले नाही. आज टॉप कंपन्यांमध्ये विप्रोचा समावेश होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe