Snake Island : हा आहे सापांचा देश ! जिथे राहातात फक्त विषारी साप जे एका क्षणात मानवाचे मांस देखील संपवू शकतात

Ahmednagarlive24 office
Published:

Snake Island :- साप म्हटले म्हणजे मृत्यू अशी आपली सर्वसाधारण समज आहे. जगाच्या पाठीवर अनेक सापांच्या प्रजाती आहेत. परंतु आपल्याला माहित आहे की त्यातील काही प्रजाती या विषारी आहेत. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने नाग,

घोणस, फुरसे आणि मन्यार या जाती प्रामुख्याने अति विषारी या प्रकारात येतात. सापाबद्दल अनेक मनोरंजक अशा गोष्टी देखील आहेत. तसे पाहायला गेले तर सापांचे वेगळे जग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

जर आपण एकेक गोष्टींची माहिती करत गेलो तर आपला विश्वास बसणार नाही अशा अनेक गोष्टी या माध्यमातून आपल्याला कळतील. पृथ्वीतलावरील अंटार्टिका हा भाग सोडला तर जगाच्या प्रत्येक ठिकाणी साप आढळून येतात.

परंतु जर जगाच्या पाठीवरील सर्वात जास्त सापांचे राज्य किंवा सापांचा वावर ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण ब्राझील या देशात असून त्याला स्नेक आयलँड या नावाने ओळखले जाते. नेमके या परिसराला स्नेक आयलँड का म्हणतात यामागे असलेले कारण ही तसेच आहे.

स्नेक आयलँडवर आहे सापांचे साम्राज्य

जगातील ब्राझील या देशाच्या किनारपट्टीपासून अगदी हाकेच्या अंतरावर स्नेक आयलँड हा परिसर आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक पायरीवर म्हणजेच टप्प्याटप्प्यावर साप दिसून येतील. जगातील जर सर्वात विषारी सापांचा वावर कुठे असेल तर तो या स्नेक आयलँड या ठिकाणी आहे.

हे ठिकाण पृथ्वीवरील असे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सोनेरी लान्सहेड साप देखील पाहायला मिळतो. ही सापाची अत्यंत प्राण घातक अशी प्रजात आहे. सापांच्या जास्त अस्तित्वामुळे स्नेक आयलँड म्हणजेच हे बेट लोकांसाठी दुर्गम आहे. या स्नेक आयलँड चे खरे नाव इल्हा दा क्वीमाडा ग्रांडे असे आहे. ब्राझील मधील साओ पाउलो पासून 90 मैलांवर हे ठिकाण आहे.

परंतु या ठिकाणी माणूस जाऊ शकत नाही. या बेटावर कोणाला जाता येईल किंवा कोणाला भेट द्यायची हे ब्राझीलियन नेव्ही ठरवते. कारण या माध्यमातून व्यक्तीची स्वतःची सुरक्षा आणि सापांची सुरक्षा सुनिश्चित केले जाते. या ठिकाणी फक्त काही शास्त्रज्ञ आणि नौदल अधिकारी भेट देऊ शकतात.

कारण ही जागा संपूर्णपणे सापाने भरलेली आहे. या ठिकाणी गोल्डन लान्सहेड आणि बोथ्रोप्स इन्सुलरिसचा येथील समावेश आहे व हा एक विषारी साप आहे जो वीस इंचापेक्षा जास्त वाढतो. या सापाचे प्रमुख खाद्य हे पक्षी आहे. या सापाचे विष खूप वेगाने कार्य करते. एकदा दंश झाला की लगेच पक्षी मारला जातो.

त्याच प्रमाणात गोल्डन लान्सहेड हा देखील तेवढाच प्राण घातक विषारी साप आहे. हे दोघेही साप या ठिकाणी आढळून येतात. या बेटावर तुम्ही गेलेत आणि तुमच्यासमोर साप येणार नाही असं होऊ शकत नाही. येथे प्रति चौरस मीटर मध्ये पाच साप आढळून येतात.

यावरून तुम्हाला त्या ठिकाणच्या सापांची संख्या लक्षात येईल. या ठिकाणी एवढे विषारी साप आहेत की त्या ठिकाणी पक्षी देखील येण्यास घाबरतात. परंतु पक्षी स्थलांतर करत असताना या मार्गावरून जात असताना विश्रांतीसाठी या ठिकाणी थांबतात व सापांना आयते अन्न मिळते.

स्नेक आयलँड या ठिकाणी एक लाईट हाऊस देखील आहे. एकेकाळी त्या ठिकाणी लोक राहत होते याचा पुरावा हे लाईट हाऊस आहे. या ठिकाणी किपर आणि त्याचे कुटुंब 1909 ते 1920 दरम्यान स्नेक बेटावर राहत होते.

परंतु सापांमुळे हे कुटुंब देखील त्या ठिकाणी उध्वस्त झाले असे म्हटले जाते. स्नेक आयलँड हे ठिकाण संपूर्णपणे सापाने भरलेले आहे. या ठिकाणी असलेले विषारी साप एका क्षणात मानवाचे मांस देखील वितळू शकतात.इतके ते विषारी आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe