Tirupati Balaji : आंध्र प्रदेशातील श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी मंदिर हे हिंदू धर्मातील एक सर्वात मोठे तीर्थक्षेत्र. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जगभरातील भावी दररोज लाखोंच्या संख्येने तिरुपतीला भेट देत असतात. या ठिकाणी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात दानही करतात. पैसे सोने-चांदी यासोबतच इथे अन्नदान देखील मोठ्या प्रमाणात होते.
याशिवाय येथे काही जण मोबाईल सुद्धा दान करतात. या मंदिरात दरवर्षी करोडो रुपयांचे दान येते. म्हणूनच तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. दरम्यान आता आंध्र प्रदेशातील तिरूमला तिरुपती देवस्थानने मंदिराला दान करण्यात आलेल्या मोबाईल फोन संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंदिर प्रशासनाकडून तिरुपती मंदिरात भाविकांनी जे मोबाईल दान केलेले आहेत त्यांचा आता लिलाव केला जाणार आहे. मंदिराला दान करण्यात आलेले अन वापरलेले तसेच आंशिक खराब झालेले फोन या लिलावातून विकले जाणार आहेत.
यामुळे जर तुम्हालाही तिरुपती बालाजी मंदिराला दान करण्यात आलेले हे मोबाईल फोन खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे.
खरे तर अनेक भाविक तिरुपती बालाजी देवस्थानाला दान करण्यात आलेल्या वस्तू घेण्यास उत्सुक असतात यामुळे देवस्थानचा हा निर्णय अशा भाविकांसाठी दिलासाचा राहणार आहे. दरम्यान आता आपण या लिलाव प्रक्रियेची माहिती जाणून घेऊयात.
कधी होणार लिलाव
मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंदिरातील दान करण्यात आलेल्या मोबाईलचा लिलाव केला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा लिलाव ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे.
आंध्रप्रदेश राज्य सरकारच्या ई-प्रोक्योरमेंट पोर्टलच्या माध्यमातून लिलावाची प्रक्रिया संपन्न होईल अशीही माहिती देवस्थानकडून यावेळी देण्यात आली. या लिलावामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन असतील.
कार्बन, एलआयएफ, नोकिया, सॅमसंग, लावा, आयटेल, लेनोवो, फिलीप्स, एलजी, सॅन्सुई, ओप्पो, पोको, एसर, पॅनॉसॉनिक , ऑनर, वन प्लस, ब्लॅकबेरी, जिओनी, मायक्रोसॉफ्टस असुस, कुलपॅड, एचडीसी,मोटोरोला,टेक्नॉ, इन्फिनिक्स, रियलमी, हुआवेई, सेलकॉन, मायक्रोमॅक्स अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन या ऑनलाइन लिलावाच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
लिलावाच्या प्रक्रियेत सहभाग कसा नोंदवायचा
जर तुम्हाला या लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवायचा असेल, जर तुम्हालाही हे मोबाईल खरेदी करायची असतील तर तुम्हाला आंध्रप्रदेश राज्य सरकारच्या ई-प्रोक्योरमेंट पोर्टल वर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
तसेच जर तुम्हाला या लिलाव प्रक्रियेची डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही देवस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता. यासोबतच https://konugolu.ap.gov.in या संकेतस्थळावर जाऊन किंवा 0877-2264429 या नंबर वर कॉल करून देखील तुम्ही लिलाव प्रक्रियेची डिटेल माहिती जाणून घेऊ शकणार आहात.