Today Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुण्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि विदर्भालाही अलर्ट मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज दिला असल्याने शेतकऱ्यांची काळजाची धडधड वाढली आहे.
डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते याचा एक अंदाज समोर येत असल्याने शेतकऱ्यांचे चिंता वाढलीये.
हवामान खात्यातील तज्ञांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यात गारठा कमी झाला मात्र धुकं उशिरापर्यंत राहातं. तर काही भागांमध्ये अंशत: ढगाळ हवामान असल्याने फळभागा आणि शेतीला मोठा फटका बसला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहिल्यामुळे तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे.
मराठवाड्यात काही भागांमध्ये तुरळक पावसाच्या सरी देखील पडू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून या अनुषंगाने हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण ऐन हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय याबाबत बोलताना पुणे वेधशाळेने मोठी माहिती दिली.
वेधशाळेने म्हटल्याप्रमाणे आग्नेय अरबी समुद्रामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशनसारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर झाला आहे. याच सर्क्युलेशनच्या प्रभावामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रसह मराठवाड्यात आज तारीख 15 जानेवारी 2025 रोजी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असे पुणे वेधशाळे मधील हवामान तज्ञांनी म्हटले आहे.
एवढेच नाही तर उद्या विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे. आज पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे तर उद्या विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
म्हणून सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यातून थंडी देखील गायब झालीय. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत असून यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी आज आणि उद्या पावसाच्या सरी बरसणायची शक्यता आहे. यामुळे आगामी काही तास महाराष्ट्रात एवढी थंडी पाहायला मिळणार नाही असे दिसते.