‘ही’ आहेत विद्यार्थ्यांसाठी जगातील बेस्ट टॉप 5 शहरे ! बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग जाहीर; शिक्षणाचे माहेरघर पुणे, मुंबई कितव्या स्थानी ?

विद्यार्थ्यांसाठी जगातील टॉप 5 शहरे कोणती ? याचीच माहिती आज आपण या लेखातून पाहणार आहोत. या यादीत महाराष्ट्रातील मुंबई, पुण्याचा नंबर कितवा लागतो याचा सुद्धा आढावा आपण येथे घेणार आहोत.

Published on -

Top City For Students : भारतात पुणे मुंबई दिल्ली बेंगलोर अशी शहरे शिक्षणासाठी विशेष ओळखली जातात.  पुण्याला तर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी एकवटतात. देशाबाहेरील विद्यार्थी देखील या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत.

पण तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी जगातील बेस्ट टॉप 5 शहरे कोणती? याची माहिती आहे का ? नाही. मग आता याच संदर्भातील एक यादी समोर आली आहे. क्वाक्वेरेली सायमंड्स बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग 2026 जाहीर करण्यात आली आहे.

यात फक्त अडीच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली आणि किमान 2 युनिव्हर्सिटीज असलेली शहरेच या यादीच्या टॉप 100 साठी पात्र ठरली आहेत. दरम्यान आता आपण या यादीनुसार जगातील टॉप 5 बेस्ट स्टुडंट सिटी कोणती याबाबत माहिती पाहणार आहोत. 

सियोल, दक्षिण कोरिया : दक्षिण कोरिया शिक्षणासाठी संपूर्ण जगात ओळखले जाते. याच दक्षिण कोरियातील सियोल हे शहर शांत, उत्साही अन त्याच्या अनेक विरोधाभासांसह, वर्ल्ड टॉप 10 बेस्ट स्टुडंट सिटीजच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या शहरातील तब्बल 20 विद्यापीठांनी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये स्थान मिळवले आहे. यामुळे हे विद्यार्थ्यांसाठी एक बेस्ट ठिकाण बनले आहे.

टोकियो जपान : जपानमधील टोकियो हे शहर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येते. उच्च दर्जाचे आयुष्य आणि इनोवेशन यामुळे जपान मधील टोकियो हे शहर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरातील विद्यार्थी टोकियो या शहरात शिक्षण घेत आहेत भारतातीलही अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी आहेत.

लंडन, युके : या यादीत लंडन युनायटेड किंगडम या शहराचा तिसरा नंबर लागतो. या शहरातही 20 प्रतिष्ठित विद्यापीठ आहेत. मात्र यावेळी या शहराची रँकिंग कमी झाली आहे. कारण म्हणजे हे शहर विद्यार्थ्यांना बजेट फ्रेंडली वाटत नाही. येथील कॉस्टिंग विद्यार्थ्यांना परवडत नाही. पण तरीही या ठिकाणी कॉलिटी एज्युकेशन उपलब्ध आहे आणि म्हणून अनेक जण इथे शिक्षणासाठी आहेत. जगभरातील विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठीचे हे एक हॉट फेवरेट डेस्टिनेशन आहे.

म्युनिक जर्मनी : पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी झिरो ट्युशन फी असल्याने विद्यार्थी या शहरात शिक्षणासाठी गर्दी करतात. जगभरातील विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. हे एक परवडणारे आणि रोजगाराचे चांगले पर्याय असणारे शहर आहे आणि म्हणूनच या यादीत या शहराला चौथा क्रमांक मिळाला आहे.

मेलबर्न ऑस्ट्रेलिया : या यादीत ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या शहराचा पाचवा नंबर लागतो. या शहराचे सर्वात मोठे अट्रॅक्शन म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न. दरम्यान या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. येथे जगभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी गर्दी करत आहेत.

मुंबई, पुण्याचा नंबर कितवा ?

क्वाक्वेरेली सायमंड्स बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंगच्या टॉप 100 शहरांमध्ये फक्त देशातील आर्थिक राजधानीचा अर्थातच मुंबईचा नंबर लागतो. मुंबई या यादीत 98 व्या स्थानावर आहे. मुंबई हे विद्यार्थ्यांसाठी किफायतशीर आहे. चार्मिंग आणि फ्रेंडली आहे. रोजगाराच्या बाबतीतही मुंबई आघाडीवर आहे आणि म्हणूनच भारतातील हे एकमेव शहर टॉप 100 मध्ये समाविष्ट आहे. दुसरीकडे दिल्ली मुंबई बेंगलोर आणि चेन्नई ही शहरे जगातील टॉप 130 शहरांमध्ये समाविष्ट आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!