Top Colleges In India : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 5 मे 2025 रोजी राज्य बोर्डाचा एच एस सी चा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांनी चांगली चमकदार कामगिरी केलेली आहे. आता बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी विविध प्रवेश परीक्षा देणार आहेत.
खरंतर राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे आणि आता विद्यार्थ्यांकडून बारावी झाली पुढे काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. खरे तर बारावीनंतर अनेक जण विविध मेडिकल कोर्सेस साठी ऍडमिशन घेतात.

दरम्यान जर तुमचाही मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचा प्लॅन असेल? तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. कारण की आज आपण देशातील टॉप 10 नामांकित खाजगी मेडिकल कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत.
सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये असते प्रचंड स्पर्धा
खरे तर बारावीनंतर अनेक जण एमबीबीएस साठी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. विद्यार्थ्यांना जर स्वस्तात एमबीबीएस चा कोर्स करायचा असल्यास त्यांच्यासाठी सरकारी कॉलेजचा ऑप्शन बेस्ट ठरतो. देशातील अनेक सरकारी कॉलेज विद्यार्थ्यांना MBBS चा कोर्स ऑफर करत आहेत. मात्र सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन हवे असेल तर NEET च्या एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना चांगला स्कोर करावा लागतो.
दुसरीकडे देशातील अनेक खाजगी मेडिकल कॉलेजेस सुद्धा एमबीबीएस चा कोर्स ऑफर करत आहेत मात्र अशा कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी लाखो रुपयांची फी भरावी लागते. पण देशात असेही काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जे की कमी फी घेतात. दरम्यान आज आपण अशाच स्वस्तात चांगले शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या टॉप 10 प्रायव्हेट कॉलेजेसची माहिती पाहणार आहोत.
टॉप 10 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची यादी
1)आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे स्थित गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठातील आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस हे देशातील एक असे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे जे की विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण आणि सुविधा पुरवत आहे.
या कॉलेजमध्ये दरवर्षी NEET UG स्कोअरच्या आधारे MBBS अभ्यासक्रमासाठी 100 उमेदवारांना प्रवेश दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. जर तुम्हालाही एमबीबीएसला ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी दिल्ली येथील हे प्रायव्हेट कॉलेज एक बेस्ट ऑप्शन ठरू शकते.
2)महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस : या यादीत आम्ही महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एमजीआयएमएस), वर्धा या देशातील टॉपच्या प्रायव्हेट कॉलेजला दुसऱ्या स्थानी ठेवले आहे. खरे तर वर्धा येथील हे नामांकित प्रायव्हेट मेडिकल कॉलेज देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असल्याचा दावा केला जातो.
या ठिकाणी विविध मेडिकल कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र या कॉलेजमधील मेडिकल कोर्सेस साठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर नीट परीक्षा द्यावी लागते आणि या प्रवेश परीक्षेच्या स्कोरवरच येथे ऍडमिशन मिळते. या ठिकाणी दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
3)सीएमसी, वेल्लोर : या यादीतील तिसर प्रायव्हेट कॉलेज म्हणजे वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल. हे कॉलेज सर्वात स्वस्त खाजगी मेडिकल कॉलेज मानले जाते. यामुळेच या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी असते.
येथे एमबीबीएस, एमडी बीपीटी, बीडीएस यासारखे अभ्यासक्रम उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे. जर तुम्हाला या कॉलेजमधून एमबीबीएस करायचे असेल तर तुम्हाला यासाठी वार्षिक 60 हजार रुपयांपर्यंतची फी भरावी लागणार आहे. प्रवेशाबाबत बोलायचं झालं तर नीट एक्झाम मध्ये आलेल्या स्कोरच्या आधारावरच येथे प्रवेश मिळतो.
हे प्रायव्हेट कॉलेजेसही आहेत बेस्ट
4)केम्पेगौडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (केआयआयएमएस), बंगळुरू
5)एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस अँड हॉस्पिटल, धारवाड कर्नाटक
6)महाराजा अग्रसेन मेडिकल कॉलेज, अग्रोहा, पंजाब
7)सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज, बंगळुरू
8)एमएस रामैया मेडिकल कॉलेज, बंगळुरू
9)कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मंगलोर
10)त्रिची एसआरएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, तिरुचिरापल्ली