Top Engineering College : CBSE पाठोपाठ महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल गेल्या महिन्यात म्हणजे पाच मे 2025 रोजी जाहीर झाला. आता निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र कॉलेज प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे.
बारावी सायन्स मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता आपल्या आवडीनुसार पुढील वर्गात प्रवेश घेत आहेत. विद्यार्थी आता त्यांच्या आवडीनुसार करिअरच्या वेगवेगळ्या वाटा निवडतांना दिसत आहेत. मात्र बारावी सायन्स झालेले बहुतांश विद्यार्थी मेडिकल कॉलेजेस मध्ये आणि इंजीनियरिंग कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेताना दिसतात.

मेडिकल आणि इंजीनियरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्या देशात सर्वाधिक आहे. काही विद्यार्थी मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेण्याचा विचार करत असताना, बरेच सारे विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रात आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
खरेतर इंजिनिअरिंग क्षेत्र हे आजच्या काळात सर्वाधिक मागणीत असलेलं आणि वेगाने वाढणारं क्षेत्र मानलं जातं आहे आणि विद्यार्थ्यांनी इंजीनियरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना नक्कीच चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
दरम्यान अनेक विद्यार्थ्यांकडून आम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे पण कोणत्या कॉलेजमधून इंजीनियरिंग करावी हा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान आज आपण विद्यार्थ्यांची हीच अडचण दूर करणार आहोत.
कारण की, आता आपण देशातील टॉप 5 इंजीनियरिंग कॉलेजची माहिती पाहणार आहोत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या NIRF रँकिंग 2024 नुसार देशातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजस कोणती आहेत? याची यादी आम्ही येथे दिलेली आहे.
देशातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज
- IIT मद्रास
- IIT दिल्ली
- IIT बॉम्बे
- IIT कानपूर
- IIT खरगपूर
या कॉलेजेस मध्ये पण ऍडमिशन घेऊ शकतात
IIT रुड़की, IIT गुवाहाटी, IIT हैदराबाद, NIT त्रिची आणि IIT-BHU (वाराणसी) हे कॉलेज सुद्धा देशातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये समाविष्ट आहेत. यामुळे जर तुम्ही या कॉलेजेस मधून इंजीनियरिंग केली तर तुमची लाईफ सेट होईल. खरेतर, या यादीतील IIT मद्रासने सलग काही वर्षे अव्वल स्थान कायम राखले आहे.
हे कॉलेज गेल्या काही वर्षांपासून देशातील नंबर एक कॉलेज म्हणून ओळखले जात आहे. पण, या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे हे अत्यंत कठीण काम असते आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना JEE Advanced परीक्षेत उच्च गुण मिळवावे लागणार आहेत.