Top Engineering College : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल जाहीर केला. बारावीच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली असून यंदाचा निकाल हा फारच उत्साहवर्धक राहिला आहे. यंदाच्या बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत.
दरम्यान आता बारावीत उत्तीर्ण झालेले बहुतांशी विद्यार्थी इंजीनियरिंगला ऍडमिशन घेणार आहेत. राज्यातील लाखो विद्यार्थी हे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतील असे बोलले जात आहे.

अशा परिस्थितीत आज आपण ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर इंजीनियरिंग करायची आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण भारतातील टॉप सात इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत आणि यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या कॉलेजचा समावेश होतो याचाही आढावा घेणार आहोत.
ही आहेत भारतातील टॉप 7 इंजीनियरिंग कॉलेज
आयआयटी मुंबई : आयआयटी मुंबई हे देखील भारतातील एक नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज आहे. येथेही देश विदेशातील विद्यार्थी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून जर तुम्हालाही इंजीनियरिंग करायचे असेल तर तुमच्यासाठी हे कॉलेज एक बेस्ट ऑप्शन राहणार आहे. महत्वाची बाब अशी की, भारतातील टॉप सात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयआयटी मुंबई या एकमात्र महाराष्ट्रातील कॉलेजचा समावेश होतो.
आयआयटी मद्रास : भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून या कॉलेजला ओळखले जाते. या कॉलेजला ऍडमिशन मिळालं की विद्यार्थ्यांची लाईफ सेट होते. या कॉलेजमध्ये देशभरातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसेच परदेशातील अनेक विद्यार्थी येथे इंजिनिअरिंग करतात.
यामुळे जर तुम्हाला इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही या कॉलेजला प्राधान्य देऊ शकता. सिविल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल अशा विषयात येथून बीटेकची पदवी घेता येते. जर तुम्हालाही या विषयातून इंजिनिअरिंग करायची असेल तर तुमच्यासाठी हे कॉलेज बेस्ट राहणार आहे.
आयआयटी खरगपूर : देशातील सर्वोच्च इंजीनियरिंग कॉलेजमध्ये याही कॉलेजचा समावेश होतो. हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून ओळखले जाते. या कॉलेजमध्ये ही देश – विदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि येथून इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना करोडो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सुद्धा मिळतं आहे.
आयआयटी गांधीनगर : गांधीनगर येथील आयआयटी हे देखील देशातील एक प्रमुख इंजीनियरिंग कॉलेज असून येथेही अनेक जण शिक्षण घेण्यास उत्सुक आहेत. हे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये फारच लोकप्रिय असून या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी जेईई परीक्षामध्ये चांगले मार्क्स मिळवावे लागतात. या कॉलेजमधून विद्यार्थ्यांना विविध विषयात बीटेकची पदवी घेता येते. जर तुम्हालाही इंजीनियरिंग करायची असेल तर गांधीनगरची आयआयटी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहणार आहे.
आयआयटी दिल्ली : देशाच्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील आयआयटी विद्यार्थ्यांसाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. भारतातील टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये आयआयटी दिल्लीचा समावेश होतो. हे कॉलेज दक्षिण दिल्लीमध्ये असून येथे देश विदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि आपले करिअर सेट करत आहेत.
आयआयटी रुरकी : हे आयटी कॉलेज देशातील टॉप सात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येते आणि हे कॉलेज उत्तराखंडमध्ये आहे. या इंजीनियरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकलमध्ये बी.टेक पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असून जर तुम्हालाही या विषयात इंजिनिअरिंग करायचे असेल तर तुम्ही या कॉलेजला प्राधान्य देऊ शकता.
आयआयटी हैदराबाद : टेक सिटी म्हणून ख्यातनाम असणाऱ्या हैदराबाद मध्ये असणारे आयआयटी देशातील टॉप सात आयआयटी पैकी एक आहे. या कॉलेजचा कॅम्पस हा फारच विस्तृत आहे. देशातील सर्वोत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या कॉलेजचा समावेश होतो आणि येथेही देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. हे अभ्यासक्रम इथं उपलब्ध आहेत.