Top Engineering Colleges : बारावीनंतर इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेणार आहात का ? पण कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावे सुचत नाहीये. मग आजची ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त असेल. कारण आज आपण देशातील अशा एका इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत जिथून तुम्ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले तर तुम्हाला google, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांमध्ये कामाची संधी उपलब्ध होऊ शकते.
खरेतर, भारतात इंजिनिअरिंग करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. देशात इंजीनियरिंगचे हजारो कॉलेजेस आहेत. आपल्या महाराष्ट्रात देखील इंजिनिअरिंगचे असंख्य कॉलेज पाहायला मिळतात. मुंबई पुणे नागपूर नाशिक सारख्या शहरांमध्ये अनेक प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत.

आयआयटी बॉम्बे हे असेच एक प्रतिष्ठित कॉलेज आहे. पण आज आपण बिहार राज्यातील एक इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत जे की स्वातंत्र्याच्या पूर्वी स्थापित झालेले आहेत. तुम्ही जर या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवलं तर तुमच करिअर नक्कीच सेट होणार आहे.
हे आहे बिहारमधील प्रतिष्ठित कॉलेज
बिहार मधील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था पटना म्हणजेच एनआयटी पटना ही देशातील एक जुनी आणि सर्वात प्रतिष्ठित संस्था आहे. या कॉलेजची स्थापना 1886 मध्ये झाली आहे. म्हणजेच हे कॉलेज भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झाली आहे.
सुरुवातीला या कॉलेजचे नाव बिहार स्कूल ऑफ इंजीनियरिंग असे होते, नंतर मग या कॉलेजला बिहार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग असे म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर या कॉलेजला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला आणि आज हे कॉलेज भारतातील एक नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून ओळखले जात आहे.
कॉलेजमध्ये कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत?
एनआयटी पटनामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अभियांत्रिकी, वास्तुकला, विज्ञान आणि संशोधनाशी संबंधित अभ्यासक्रम या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत.
विद्यार्थी येथून बी.टेक, बी.आर्क, एम.टेक, एमएससी आणि पीएचडीचे शिक्षण घेऊ शकतात. संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, मेकॅनिकल आणि आर्किटेक्चर सारख्या विषयांमध्ये उच्च स्तरीय शिक्षण सुद्धा दिले जात आहे.
पण या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचे असेल तर राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे. जसे की बीटेकला आणि बी. आर्कला ऍडमिशन घ्यायचे असेल तर जेईई मेन मध्ये चांगले स्कोर येणे आवश्यक आहे.
इंजीनियरिंगची फी किती आहे
एनआयटी पटनामध्ये उच्च दर्जाचे शिक्षण मिळते आणि या कॉलेजची फी सुद्धा फारच कमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कॉलेजमध्ये बी टेक आणि बी.आर्कसाठी विद्यार्थ्यांना एका सेमिस्टरसाठी 62 हजार पाचशे रुपये एवढी फी भरावी लागते.
त्याचवेळी एमटेक करायचे असल्यास विद्यार्थ्यांना एका सेमिस्टरसाठी 35 हजार रुपये आणि एमएससी तसेच पीएचडी करायचे असल्यास एका सेमिस्टरसाठी 7,500 इतके शुल्क भरावे लागते.
महत्त्वाची बाब म्हणजे या कॉलेजमध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, ओएनजीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स सारख्या कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी येथून इंजीनियरिंग केल्यास त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता अधिक आहे.