Top Engineering Colleges : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आणि त्याआधी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. 13 मे रोजी दहावीचा आणि पाच मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला.
या दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी तयारी करत आहेत. अकरावीची ऍडमिशन प्रोसेस नुकतीच सुरू झाली आहे तर दुसरीकडे डिग्रीची ऍडमिशन प्रोसेस सुद्धा सुरु झालीये.

यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चांगल्या कॉलेजची शोधाशोध केली जात आहे. दरम्यान, जर तुम्हीही 11 वीसाठी किंवा डिग्री साठी चांगले कॉलेज शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला कल्याण मधील टॉप पाच कॉलेजची माहिती सांगणार आहोत.
या टॉप पाच कॉलेजमध्ये 2 इंजिनिअरिंग कॉलेजचाही समावेश होतो. म्हणून जर तुम्हाला बारावी सायन्स नंतर इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकता.
मुंबई जवळील टॉप 5 कॉलेजेस
इंदाला कॉलेज ऑफ इंजीनियरिंग : बारावी सायन्स नंतर इंजीनियरिंग करायचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी कल्याण मधील हे कॉलेज फायद्याचे राहणार आहे. या ठिकाणी तुम्हाला उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल. बीई आणि बीटेक साठी हे कॉलेज फारच बेस्ट आहे. JEE मेन्स एन्ट्रान्स एक्झाम दिलेले विद्यार्थी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात.
रिगल कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंट : तुम्हाला बारावीनंतर इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही रिगल कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या कॉलेजचा विचार करू शकता. कल्याण जवळील हे कॉलेज तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.
मोहिनदर सिंग कबाल सिंग डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स : बारावीनंतर आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी हे कॉलेज परफेक्ट राहणार आहे. हे कल्याण मधील एक नामांकित डिग्री कॉलेज आहे.
के वी पेंढारकर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स : आर्टस् सायन्स अँड कॉमर्स मध्ये करिअर करायच असेल तर तुम्ही याला प्राधान्य देऊ शकता. कल्याण जवळील हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. हे कॉलेज डोंबिवली मध्ये स्थित असून कल्याण आणि डोंबिवली परिसरातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
वंदे मातरम डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, डोंबिवली : पेंढारकर कॉलेज प्रमाणेच वंदे मातरम डिग्री कॉलेज सुद्धा डोंबिवली मधील एक नामांकित कॉलेज आहे. बारावीनंतर आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स शाखेत ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्ही या कॉलेजला प्राधान्य द्यायला हवे. जे विद्यार्थी डोंबिवली मध्ये राहत असतील त्यांच्यासाठी नक्कीच हे कॉलेज फायद्याचे राहणार आहे.