Top Engineering Colleges : बारावीनंतर इंजीनियरिंगला ॲडमिशन घेण्याच्या तयारीत आहात का? अहो मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर गेल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात बारावीचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आला.
बारावीचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थी आता पुढील वर्गातील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. जे विद्यार्थी बारावी सायन्स उत्तीर्ण झाले आहेत ते मेडिकल आणि इंजीनियरिंगला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहे.

पण अनेकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील टॉप इंजीनियरिंग कॉलेज बाबत विचारणा होत आहे. अशा परिस्थितीत आज आपण राजधानी मुंबई आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातीप्राप्त असणाऱ्या पुण्यातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती पाहणार आहोत.
मुंबई आणि पुण्यातील टॉप इंजीनियरिंग कॉलेज
ICT मुंबई : आयसीटी मुंबई हे एक अभिमत विद्यापीठ असून महाराष्ट्रातील टॉप इंजीनियरिंग कॉलेजेस मध्ये या कॉलेजचा सुद्धा नंबर लागतो. जर तुम्हाला मुंबईमधून इंजीनियरिंग करायची असेल तर तुमच्यासाठी आयसीटी मुंबईचा पर्याय बेस्ट राहणार आहे.
जर तुम्ही येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले तर नक्कीच तुम्हाला मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सेट होणार आहे.
IIT मुंबई : राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील एक महत्त्वाचे इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे आयआयटी मुंबई. हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून ओळखले जाते. या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड हा फारच शानदार आहे.
येथून इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी मिळते. जर तुम्हाला इथे ऍडमिशन मिळाले तर नक्कीच तुमचे आयुष्य सेट होऊ शकते.
येथून इंजिनिअरिंगच्या शिक्षण घेतलेल्या बहुतांश विद्यार्थी प्रदेशात सुद्धा नोकरी करत आहेत. मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण नक्कीच घ्यायला हवे.
DIAT पुणे : डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे हे शिक्षणाचे माहेरघर पुण्यातील एक नामांकित कॉलेज आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे या शैक्षणिक संस्थेचा कारभार हा भारत सरकारच्या अंतर्गत येतो.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत या कॉलेजचे संचालन केले जात आहे. जर तुम्हाला पुण्यातुन इंजीनियरिंग करायची असेल तर या कॉलेजचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. इथून इंजिनिअरिंगच्या शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळते.
अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे : हे देखील पुण्यातील एक नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय कॉलेजच्या यादीत याही कॉलेजचा समावेश होतो. हे महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.
देशातील सर्वाधिक जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयात या कॉलेजचा समावेश होतो. येथून इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त केल्यास विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळते. म्हणून तुम्हाला इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही या कॉलेजचा पर्याय निवडू शकता.