Top Law College : तुम्हीही ग्रॅज्युएशन नंतर एलएलबी करण्याच्या तयारीत आहात का किंवा बारावीनंतर इंटिग्रेटेड पाच वर्षाच्या लॉ कोर्सला ऍडमिशन घेणार आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.
खरे तर ग्रॅज्युएशन नंतर अनेकजण तीन वर्षांच्या एलएलबी कोर्सला ऍडमिशन घेतात. तसेच काही विद्यार्थी बारावीनंतर बीए एलएलबी, बीकॉम एलएलबी, बीएससी एलएलबी अशा इंटिग्रेटेड पदवीला प्रवेश घेतात.

दरम्यान जर तुम्हीही कायद्याचा अभ्यास करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप 10 कॉलेजेसची माहिती सांगणार आहोत. कायद्याचा अभ्यास हा केवळ पुस्तकांपुरता आणि न्यायालयांपुरता मर्यादित नसतो. कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी हा समाजाला दिशा देण्याच काम करतो. आज कायद्याचे शिक्षण फारच आव्हानात्मक बनले आहे.
यामुळे जर तुम्हाला एलएलबी ला ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्ही नामांकित महाविद्यालयांमधून पदवी धारण करणे आवश्यक आहे. अशातच आता एनआयआरएफने महाविद्यालयांची रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंग नुसार आज आपण 2025 मधील टॉप 10 कॉलेजेसची माहिती पाहूयात.
वकील किंवा कायदा पदवीधराचा प्रभाव केवळ न्यायालयापुरता मर्यादित असतो असा जर तुमचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. वकील किंवा कायद्याचे पदवीधर धोरणनिर्मिती, प्रशासन, कॉर्पोरेट प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्येही महत्त्वाची भूमिका निभावतो.
म्हणजे कायद्याचे शिक्षण घेतले तर फक्त वकीलच बनता येईल हा जो तुमचा समज आहे तो चुकीचा आहे. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर घडवता येते. पण यासाठी योग्य महाविद्यालयातून कायद्याचा अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे.
ही केवळ पदवी मिळवण्याची बाब नाही तर चांगले प्रशिक्षण, संशोधन अनुभव आणि व्यावहारिक अनुभव घेण्याची गोष्ट आहे. CLAT परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकी फक्त काही हजार विद्यार्थीच सर्वोच्च लॉ कॉलेजमध्ये पोहोचू शकतात.
NIRF रँकिंगनुसार टॉप 10 महाविद्यालय
नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी – बेंगळुरू
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी – नवी दिल्ली
नालसर युनिव्हर्सिटी ऑफ लॉ – हैदराबाद
द वेस्ट बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल सायन्सेस – कोलकाता
गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी – गांधीनगर
आयआयटी खरगपूर – खरगपूर
सिम्बायोसिस लॉ स्कूल – पुणे
जामिया मिलिया इस्लामिया – नवी दिल्ली
अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी – अलीगड
शिक्षा ओ अनुसंधान – भुवनेश्वर