MAH MBA CET मध्ये 60% गुण असतील तरी महाराष्ट्रातील ‘या’ बेस्ट MBA कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणार !

पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी MBA करण्याच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. आज आपण महाराष्ट्रातील अशा काही एमबीए कॉलेजेसची माहिती जाणून घेणार आहोत, जिथे MAH CET मध्ये 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात.

Published on -

Top MBA College : तुमचाही ग्रॅज्युएशन नंतर एमबीए करण्याचा प्लॅन आहे का आणि यासाठी तुम्ही MAH MBA CET ही प्रवेश परीक्षा दिली आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की MAH CET चा रिझल्ट नुकताच जाहीर झाला आहे.

या रिझल्ट मध्ये तुम्हाला झिरो मार्क्स मिळाले असतील तरी देखील तुम्ही कॅप राऊंडसाठी एलिजिबल राहणार आहात. आता MAH CET चा रिझल्ट आऊट झाला असल्याने अनेक विद्यार्थी बेस्ट एमबीए कॉलेजच्या शोधात आहेत.

दरम्यान, आज आपण MAH CET मध्ये 60 ते 70 टक्के गुण मिळाल्यास महाराष्ट्रातील कोणत्या कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळू शकते या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. महत्त्वाची बाब म्हणजे यातील काही कॉलेजेस पुण्यासारख्या प्राईम लोकेशन वर सुद्धा आहेत.

MAH MBA CET मध्ये 60% मार्क्स असतील तरी या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार !

छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च कोल्हापूर : हे महाराष्ट्रातील एक बेस्ट एम बी ए कॉलेज आहे आणि या ठिकाणी MAH CET मध्ये 60.06% परसेंटाइल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऍडमिशन मिळू शकते.

सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड रिसर्च पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यातील हे एक बेस्ट एम बी ए कॉलेज. या ठिकाणी राज्यभरातील आणि राज्य बाहेरील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एमबीए साठी हे कॉलेज विशेष ओळखले जाते. या ठिकाणी MAH CET मध्ये 61.31% परसेंटाइल असणाऱ्यांना सुद्धा ऍडमिशन मिळू शकते.

BP हिवले एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करिअर डेव्हलपमेंट रिसर्च अहमदनगर : अहमदनगर मधील हे एमबीए कॉलेज महाराष्ट्रातील टॉप एम बी ए कॉलेजेसच्या लिस्ट मध्ये येते. इथे MAH CET मध्ये 61.90% परसेंटाइल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऍडमिशन मिळू शकते.

आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च शिरपूर : या कॉलेजमधून फार्मासिटिकल मॅनेजमेंट मधून एमबीएची पदवी घेता येऊ शकते. जर तुम्हाला फार्मासिटिकल मॅनेजमेंट मधून एमबीए करायचे असेल तर हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे कारण की इथे MAH CET मध्ये 61.90 पर्सेंटाइल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऍडमिशन मिळते.

डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव :  एमबीएचा प्लॅन असेल आणि एमएएच सीइटी मध्ये तुम्हाला 62.65% मार्च मिळाले असतील तर तुम्ही डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव या शैक्षणिक संस्थेत ऍडमिशन घेऊ शकता. या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी एमबीएचे शिक्षण घेत आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe