Top MBA Colleges : ग्रॅज्युएशन नंतर तुम्हालाही एम बी ए करायचे आहे का? पण कोणत्या कॉलेजमधून एमबीए करावे हे सुचत नाहीये, मग तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच कामाचा ठरणार आहे. खरेतर, मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) हा भारतातील सर्वात जास्त मागणी असलेल्या अभ्यासक्रमानपैकी एक आहे.
एमबीएला दरवर्षी लाखो विद्यार्थी ऍडमिशन घेतात. देशातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्थांमधून MBA डिग्री मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार नेहमीच स्पर्धा करतात. देशातील टॉप एमबीए कॉलेजेस मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट सारख्या अनेक उल्लेखनीय संस्थाचा समावेश होतो.

दरम्यान आज आपण राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच एन आय आर एफ च्या ऑल इंडिया रँकिंग मध्ये शीर्षस्थानी असणाऱ्या काही टॉपच्या MBA कॉलेजेसची माहिती पाहणार आहोत. खरेतर देशातील प्रतिष्ठित कॉलेजेसचे दरवर्षी राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) द्वारे मूल्यांकन केले जाते जे अध्यापन गुणवत्ता,
संशोधन उत्पादन आणि पदवीधर निकाल यासारख्या महत्त्वाच्या पॅरामीटर्सवर आधारित असते. दरम्यान आज आपण एन आय आर एफ च्या रँकिंग मध्ये टॉप 5 MBA कॉलेजस कोणती आहेत याची माहिती पाहणार आहोत.
ही आहेत भारतातील टॉप 5 एमबीए कॉलेजेस
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई : इंजीनियरिंग करण्यासाठी विद्यार्थी आयआयटी कॉलेजेसला प्राधान्य दाखवतात. त्याचप्रमाणे एमबीए करणारे विद्यार्थी देखील आयआयएम कॉलेजला प्राधान्य देतात.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आयआयएम मुंबई हे देखील देशातील एक प्रतिष्ठित कॉलेज आहे. हे कॉलेज ऑल इंडिया एनआयआरएफ रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवे असल्यास विद्यार्थ्यांना CAT एक्साम द्यावी लागते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकत्ता : जर तुम्हाला एमबीए करायचे असेल तर तुमच्यासाठी हे कॉलेज परफेक्ट ठरणार आहे. हे कॉलेज एनआयआरएफ रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवे असल्यास CAT एक्झाम द्यावी लागते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोझिकोडे : हे देखील देशातील प्रतिष्ठित एमबीए कॉलेजमधील एक आहे. जर तुम्हाला एमबीए करायचे असेल तर तुमच्यासाठी या कॉलेजचा ऑप्शन बेस्ट राहणार आहे. हे कॉलेज एनआयआरएफ रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तुम्हाला जर इथे ऍडमिशन मिळाले तर तुमची लाईफ नक्कीच सेट होणार आहे. या कॉलेजमध्ये एमबीएला ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला CAT एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळायला हवेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर : तुम्हालाही देशातील प्रतिष्ठित एमबीए कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर या शैक्षणिक संस्थेचा पर्याय तुमच्यासाठी परफेक्ट राहणार आहे. एनआयआरएफ रँकिंगमध्ये हे कॉलेज दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद : हे MBA कॉलेज एनआयआरएफ रँकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. जर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले तर तुमचे भविष्य नक्कीच उज्वल होणार आहे.
एमबीए साठी हे कॉलेज परफेक्ट आहे. CAT एक्झाममध्ये जर तुम्हाला चांगला स्कोर मिळाला तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते.