Top MBA Colleges : तुम्हालाही ग्रॅज्युएशन नंतर एमबीएला प्रवेश घ्यायचा आहे का? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण महाराष्ट्रातील टॉप पाच एम बी ए कॉलेज ची माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण ज्या कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत त्या कॉलेजेसला गेल्यावर्षी म्हणजे 2024 च्या एनआरएफच्या रँकिंग मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट टॉप 30 कॉलेजेस मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणूनच जर या महाराष्ट्रातील टॉप पाच कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळाले तर तुमची लाईफ सेट होणार आहे.

या कॉलेजमधून जे विद्यार्थी पास आऊट झाले आहेत त्यांना मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. म्हणूनच तुम्ही देखील या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा.
महाराष्ट्रातील टॉप 5 एमबीए कॉलेज
एसपी जैन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍंड रिसर्च : तुम्हालाही महाराष्ट्रातून एमबीए करायच आहे का ? मग तुमच्यासाठी हे कॉलेज एक परफेक्ट ऑप्शन ठरणार आहे. मुंबईमधील हे कॉलेज NIRF च्या ऑल इंडिया रँकिंग मध्ये विसाव्या नंबरवर आहे. या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्यास नक्कीच तुमची लाईफ सेट होणार आहे.
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज : सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज हे कॉलेज सुद्धा एमबीए साठी बेस्ट ठरणार आहे. या कॉलेजची ऑल इंडिया रँकिंग तेराव्या क्रमांकाची आहे.
IIT मुंबई : तुम्हाला मुंबई मधूनच एमबीए करायच असेल तर आयआयटी मुंबई हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. एनआयआरएफच्या AIR म्हणजेच ऑल इंडिया रँकिंगमध्ये या कॉलेजचा दहावा नंबर लागतो. जर तुम्ही या कॉलेजमधून एमबीएची डिग्री कम्प्लीट केली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळणार आहे.
IIM मुंबई : तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कॉलेजमधून एमबीएच शिक्षण घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आयआयएम मुंबई हा बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. 2024 च्या एनआरएफ रँकिंगनुसार, या कॉलेजला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट एमबीए कॉलेज म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. या रॅंकिंगमध्ये हे कॉलेज महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची कॉलेज ठरली आहे आणि राष्ट्रीय पातळीवर ही कॉलेजेस सहाव्या क्रमांकाची ठरली आहे.
एनएमआईएमएस मुंबई : तुम्हाला महाराष्ट्रातून आणि विशेषता मुंबई मधून जर एमबीए करायचे असेल तर या कॉलेजचा ऑप्शन तुमच्यासाठी परफेक्ट राहणार आहे. कॉलेजमधून MBA ची डिग्री घेतल्यानंतर तुमची लाईफ 100% सेट होईल आणि तुम्हाला लाखोच्या पॅकेजची नोकरी मिळेल. एनआयआरएफच्या ऑल इंडिया रँकिंग मध्ये हे कॉलेज 21 व्या स्थानावर येते.